Saturday, April 27, 2024

/

बेळगावची कन्या मराठी बिग बॉसची स्पर्धक

 belgaum

बिगबॉस रीयालीटी शो हिंदीमध्ये गाजल्यानंतर आता मराठी वाहिन्यांनी त्याचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे. कलर्स  वाहिनीने १५ एप्रिलपासून मराठीतील हा पहिलाच शो सुरु केला असून त्यामध्ये बेळगावची कन्या सई लोकूर स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे.

sailokur

हा शो तसा कठीण व कसोटी घेणारा आहे. या वाहिनीवर दररोज रात्री ९.३० ते ११ या वेळेत तो प्रसारित होईल. या शोमध्ये सहभागी स्पर्धकाना  सहा महिने फोन वापरता येणार नाही. कुटुंबातील कुणाला भेटता येणार नाही. अभिनेते  दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोचे संचालन करत आहेत. सई सोबत रेशम टिपणीस व अन्य चौदा कलाकार आहेत.पहिल्या दिवशी अभिनेत्री उषा नाडकर्णी, भूषण कडू हे सुद्धा सहभागी झाले होते.

 belgaum

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.