आगामी दोन दिवसात शहर समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन आमच्या सोबत एकीची चर्चा करावी अन्यथा आम्ही सर्वजण मिळून उपोषण करू असा ठराव कै सुरेश हुंदरे स्मृती मंच च्या वतीनं करण्यात आला आहे
शहरातील उद्योजक व्यापारी वकील डॉक्टर यांच्यासह नगरसेवक तालुका पंचायत सदस्य अन्य कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस एकीसाठी अलटीमेंटम देण्यात आला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वकील राम आपटे होते.
यावेळी राजेंद्र मुतगेकर,एन बी खांडेकर,महादेव चौगुले,पी एम टपालवाले,गोविंद राऊत,आदी उपस्थित होते. यावेळी किरण सायनाक,पंढरी परब मिलिंद हलगेकर सुनील जाधव रतन मासेकर,रेणू किल्लेकर श्रीकांत मंडेकर आदींनी विचार मांडले. समितीत एकी झाल्यास बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरल्यास त्या उमेदवाराच्या घरा समोर निदर्शन करू असे तर काहींनी बेकी असेल तर निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली.