बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितिच्या निवड प्रक्रियेने महत्वाची वळण घेतलं असून निवड समिती प्रक्रिया सुरु असताना सरस्वती पाटील, एस एल आणि मोदगेकर यांनी माघार घेतली आहे.
शनिवारी सकाळी ओरिएंटल शाळेत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या मुलाखाती सुरू होत्या त्यावेळी निवड कमिटीची स्थापना देखील करण्यात आली आहे निवड प्रक्रिया सुरू करण्या आधीच तिघांनी अर्ज माघारी घेण्याची घोषणा केली. या तिघांच्या माघारी मूळ माजी आमदार मनोहर किणेकर यांची तालुका समितीच्या उमेदवारी पदी निवड निश्चित मानली जात आहे.
जनरल मीटिंग मध्ये प्रत्येक गावात 500 मतांना एक निवड कमिटी सदस्य असे 104 सदस्य घेऊ असा ठराव झाला असताना युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या 40 सदस्यांना अतिरिक्त घालण्यात आले आहे त्यामुळं आम्हाला ही निवड समिती मान्य नाही असा आरोप रामचंद्र मोदगेकर आणि एस एल चौगुले यांनी केला आहे.
आता केवळ मोहन मोरे आणि किणेकर यांच्यात निवडीची औपचारिकता बाकी आहे