Tuesday, April 23, 2024

/

हरियाणाच्या कृष्ण कुमारने मारलं ‘महाराष्ट्र मैदान’

 belgaum

हजारोंच्या कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत, हरियाणाचा पैलवान कृष्ण कुमार याने सातव्या मिनिटाला लपेट डावावर दिल्लीचा पैलवान मोनू याला चीत करत सीमा भागातील मराठी अस्मितेच केंद्र बिंदू असलेल येळ्ळूरच महाराष्ट्र मैदान मारलं. दिल्लीचा मोनू विरुद्ध कृष्ण कुमार हरियाना यांच्यात एक नंबरची कुस्ती आयोजित करण्यात आली होती.

yellur kusti

खास चांगळेश्वरी यात्रे निमित्य दरवर्षी प्रमाणे येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानात कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली होती. येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दरवर्षी येळ्ळूर सीमाभागातील मोठी दंगल भरवण्यात येते.
दुसऱ्या क्रमांकाच्या वतीने महाराष्ट्राच्या किरण भगत याने दिल्लीच्या राजीव तोमर यांना हरवलं तर तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत माऊली जमदाडे याने हरियाणाच्या प्रेम यांस हरवलं यावेळी ५० हून अधिक लहान मोठ्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या.
जीव तुझ्यात रंगला मालिकेचे अभिनेते राणा दा या आख्यास येणार होते मात्र काही कारणावास्तव येऊ न शकल्याने बरेच जननिराश झाले होते. हजारो कुस्ती शौकीन यावेळी मैदानात उपस्थिती होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.