या महाराष्ट्र मैदानाला तोडणाऱ्या माजी आमदाराला व हे मैदान उध्वस्त करणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्या. सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करून मराठी बाणा दाखवा असे जाहीर आवाहन गुरुवर्य संभाजी भिडे यांनी आज येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानात केले.
मी अनेक कुस्ती मैदाने पाहिली पण येळ्ळूर चे महाराष्ट्र मैदान देशातील एक अव्वल दर्जाचे मैदान आहे , त्याची अनुभूती आज आली. असेही ते म्हणाले.
गुरुजींचे मैदान हलगी वाजवुन स्वागत करण्यात आले व त्यांना मानाचा भगवा फेटा बांधून जंगी स्वागत करण्यात आले.
येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच विजयी करा. या महाराष्ट्र मैदानाला तोडच नाही. तो माजी आमदार महाराष्ट्र मैदान उध्वस्त करू पाहत होता. त्या आमदाराला त्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.