दक्षिण मतदार संघातील नगरसेवकांची बैठक बुधवारी मराठी गटाने घेतली आहे. वॉर्डनिहाय बूथ मधील कार्यकर्त्यांना एकत्रित करून पुढील काम करण्याचे नियोजन करण्यात आले असून मराठी नगरसेवक आता कामाला लागले आहेत.
मागील निवडणुकीत नवीन नगरसेवक निवडून आले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आमदार संभाजी पाटील यांना निवडून देण्यात आले, त्याच प्रमाणे यावेळीही काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
येत्या दोन दिवसात उत्तर मतदार संघातील नगरसेवकांची बैठकही घेतली जाणार असून त्या भागातील वॉर्डनिहाय बूथ चे कामकाज नियोजन केले जाईल अशी माहिती गटनेते पंढरी परब यांनी दिली आहे.