Thursday, May 9, 2024

/

छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल सर्व सामान्यासाठी खुले

 belgaum

एल सी ३८८ श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल शनिवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी  सामान्य जनते साठी सुरु करण्यात आले आहे. हे ब्रिज वाहतुकीसाठी खुल करण्यात आल्याने उन्हात रहदारी त्रास घेणाऱ्या सामान्य बेळगावकर जनतेने काही प्रमाणात का होईना सुटकेचा निश्वास सोडला आहे.

old-dharwad-rob

२४ कोटी खर्चून केंद्र सरकारने तब्बल १४ महिने १२ दिवसात या ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे हे ब्रिज बंद असल्याने कपिलेश्वर ब्रिज वर रहदारीचा ताण पडत होता या ब्रिज वर आणि तानाजी गल्ली रेल्वे फाटकावर अनेकदा रहदारीच्या लांब च्या लांब रांका लागत होत्या. ओल्ड पी बी रोड चे ब्रिज सुरु झाल्याने शहापूर खासबाग वडगांव या भागातील लोकांना याचा उपयोग होणार आहे.

 belgaum

दोन दिवसापूर्वी पूर्ण झालेल्या ब्रिज वरून केवळ दुचाकी स्वार ये जाता करत होते आचार संहिता असल्याने ब्रिज सामान्य बेळगावकरांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी सिटीजन कौन्सिलने प्रादेशिक आयुक्त आणि पत्र लिहून पंत प्रधान आणि रेल्वे मंत्री सह अधिकाऱ्यांना देखील केली होती त्या नुसार हे ब्रिज शनिवारी सायंकाळी सर्व सामान्या साठी खुले करण्यात आले आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.