Friday, April 19, 2024

/

देशातील उंच ध्वज खाली उतरवला

 belgaum

देशातील सर्वात उंचीवर असलेला राष्ट्र ध्वज फाटला असल्याने खाली उतरवण्यात आला होता.गेल्या महिन्याभरा पूर्वी बसवण्यात आलेला 330 फूट उंच राष्ट्रध्वजाला हानी झाल्याने खाली उतरवण्यात आलाय.हा सर्वात मोठा अपमान आहे, राजकीय वर्चस्ववादाच्या लढाईत राष्ट्रीय ध्वजाला डावावर लावणाऱ्या नेत्याची असुरी महत्वाकांक्षा याला जबाबदार ठरली आहे.

Flagउंच अश्या या ध्वजाच्या कपड्याचे वजन 500 किलो आहे उलट्या दिशेने वारा आल्याने ध्वजाचा कपडा फाटला होता राष्ट्र ध्वजाचा अपमान टाळण्यासाठी हा ध्वज खाली उतरवण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसा पूर्वी भाजप नेते किरण जाधव यांनी देखील बेळगाव live ला संपर्क साधून ध्वज फाटल्याची कल्पना दिली होती.
आपल्या काळात आपल्या निधीतून आपण हे काम केले, आपण किती देशभक्त आहोत असे दाखवून मते मिळण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष झाले. विक्रम करण्याच्या नादात राष्ट्रीय ध्वजसंहितेला बासनात गुंडाळण्यात आले.
संबंधित राजकीय व्यक्तीच्या बरोबरीने प्रशासकीय अधिकारीही याला कारणीभूत असून, राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.