काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच चित्र असलेले कुकरचे बॉक्स भरलेली ट्रक सदाशिवनगर येथील डी सी बंगल्या जवळ सापडली आहे.
आचार संहिता जाहीर झाल्यावर केवळ चारच दिवसाच्या अंतरावर कुकर भरलेली ट्रक सापडल्याने काही काळ गोंधळ माजला होता अर्ध्यातासाहून अधिक काळ या ठिकाणी कोणताही अधिकारी फिरकला नव्हता मात्र शेवटी दोन पोलीस निरीक्षकांनी पहाणी करून सदर ट्रक जप्त केला आहे.अज्ञाता कडून भाजप नेते अनिल बेनके यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते.
सदर कुकर ची ट्रक कशी आली कुठून आली याचा तपास पोलीस करताहेत या शिवाय पूर्वीचं कुकर एकत्रित करून ट्रक डी सी बंगल्याच्या समोर प्लांट केली आहे का याचा देखील तपास सुरू आहे.