Thursday, April 25, 2024

/

संजय राऊतांचे विमानतळावर जल्लोषी  स्वागत

 belgaum

बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन गुरुवारी

बेळगावकरांचे लाडके मराठी वेबपोर्टल बेळगाव live चा पहिला वर्धापनदिन कार्यक्रम आज सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे.

सामनाचे संपादक खासदार संजय राऊत आणि मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांचे या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नुकतेच आगमन झाले आहे.
सांबरा विमानतळावर या दोन्ही पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद, शंकर बाबली महाराज व इतरांनी बेळगाव live व बेळगाव करांच्या वतीने त्यांचे स्वागत केले आहे.
हा सोहळा ठीक ५ वाजता सुरू होणार आहे. तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर, आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील, उप महापौर मधूश्री पुजारी तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ओपिनियन पोल च्या आधारावर या वर्षीचा बेळगावकर पुरस्कार वितरण होणार असून समस्त बेळगावकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.