सोनोली येथे आज झालेल्या तालुका म ए समिती मेळाव्यात एकीला तयार आहोत पण उमेदवार निवडी पूर्वी असा निर्णय घेण्यात आला.
नूतन निर्वाचित अध्यक्ष म्हात्रू झंगृचे अध्यक्ष होते. बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, सरचिटणीस मनोज पावशे, नीलिमा पावशे, भावकांना पाटील, अशोक पाटील, वाय बी चौगुले हे नेते उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत ‘हेकेखोरी’ खपवून घ्यायची नाही आणि एकी झाल्याशिवाय उमेदवार निवड करायची नाही असा निर्णय घेण्यात आला.
मेळाव्याला संपूर्ण तालुक्यातून निष्ठावंत समिती कार्यकर्ते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सभा यशस्वी करण्याचा देखील दृढ निर्धार या बैठकीत करण्यात आला.