Monday, April 29, 2024

/

ग्लोब समोरील अपघातात इंजिनियर ठार

 belgaum

ग्लोब कडून बी एस एन एल कडे वळताना दुचाकीने दुचाकीला दिलेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. लियानो इमायूल वय 24 वर्ष रा.बंगळुरू हा ऑटोमोबाईल अभियंता ठार तर राकेश राजेंद्र वय 24 रा.नंजनगुड मैसूरू जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे अभियंते अलमा मोटर्स देसुर येथे ट्रेनिंग साठी आले होते बुधवारी सकाळी ते दुचाकी वरून देसुर हुन बेळगाव ला येत होते तर  फिश मार्केट कडून गोगटे सर्कल कडे वेगाने येणाऱ्या दुचाकी बी एस एन एल कडे वळसा घेणाऱ्या दुचाकीला ठोकर दिली त्यावेळी ग्लोब समोर हा अपघात घडला आहे.मयत लियानो हा मागे बसला होता तर राकेश गाडी चालवत होता.दक्षिण रहदारी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.