Friday, May 3, 2024

/

भाजपा’चे धोरणच शेतकरी विरोधी शेतकऱ्यांचा आरोप

 belgaum

शेतकरी जगला तर देश जगेल असे थोरा मोठ्यांनी सांगितलेले आहे. मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावून देश संपवण्याचे काम भाजप पक्षाचे नेते करत आहेत, हा पक्ष शेतकरी विरोधी आहे, असा आरोप बेळगावच्या शेतकऱ्यांनी केला आहे.
हलगा मच्छे बायपास विरोधात न्यायालयीन स्थगिती असतानाही सुपीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यासाठी आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना बोलावून उदघाटन करण्यात आले. आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी गडकरी यांनी भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नीट भेटुही दिले नाही, आणि थोड्या थोडक्या बैठकीत गडकरी यांनी तुम्ही कोर्टात जा नाहीतर कुठेही जा आम्ही रस्ता करणारच अशी भूमिका घेतली, यामुळे शेतकरी नाराज झाले, त्यांनी आपला संताप बेळगाव live कडे व्यक्त केला.
स्थानिक भाजप नेत्याच्या जमिनी वाचवण्यासाठी सुपीक जमिनीवर आक्रमण करून भाजपने आपला शेतकरी विरोधी चेहरा दाखवला आहे.विकास करण्याच्या नावाखाली देशभर हेच धोरण राबवले जात आहे, मात्र शेतकरी टिकला नाही तर देश अडचणीत येईल याचा विचार या नेत्यानी कधीच केला नाही, शेतकऱ्यांना दुखावून सत्ता गाजवणे त्यांना कठीण जाईल असे शेतकरी नेते अमृत भाकोजी म्हणाले.AMrut bhakoji
गुजरात मॉडेल च्या नावावर हेच झाले आहे असा आरोपही भाकोजी यांनी केला, तिथेही विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्यात आले असून गुजरात मध्ये अन्नासाठी दुसऱ्या राज्यांवर अवलंबुन राहण्याची वेळ आली आहे. भाजप सत्तेवर येत राहिल्यास सगळीकडे ही स्थिती येईल असा धोका त्यांनी मांडला.
इंडस्ट्रीयल कॉरिडॉर च्या नावाखाली प्रत्येक प्रमुख शहरांना जोडणाऱ्या महामार्गाशेजारील जमीन अशीच बळकावून घेत आहेत. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाच प्रमुख हात आहे असा आरोप अमृत भाकोजी यांनी केला. या प्रकारातून सुटका करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे अशी गरजही त्यांनी सांगितली.
मच्छे हलगा बायपास चे उदघाटन करून या नेत्यांनी शेतकऱ्यांना दुखावले आहे. याचे फळ त्यांना शेतकरी नक्कीच देतील, उदघाटन झाले म्हणून काय झाले आम्ही न्यायालयीन लढा चालू ठेऊन हा बायपास कदापि होऊ देणार नाही, आणि करायचाच असला तर तो नापीक जमिनीतून करावा अशी मागणी भाकोजी यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.