Saturday, December 21, 2024

/

सीमा प्रश्नासह विकासावर भर देण्यास गुंजटकर प्रयत्नशील

 belgaum

पालिकेच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात गोमटेश  बेकायदेशीर शेड हटवणे असोत किंवा शिव सृष्टीचे काम पूर्ण करणे,अनगोळ येथील अडीच की मी ड्रीनेज लाईनच किंवा तलाव काम असोत पालिकेतील मुजोर अधिकाऱ्यां विरोधात अनेक विकास कामे करवून घेतलेले नगरसेवक विनायक गुंजटकर देखील दक्षिण मतदार संघातून इच्छुक आहेत.Vinayak gunjatkar
आज मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी होत आलेलो आहे. हा प्रश्न सुटावा ही प्रामाणिक इच्छा बाळगून काम करणारा एक कार्यकर्ता ही माझी ओळख आहे.
नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर पालिकेच्या माध्यमातून मी बरीच कामे केली आहेत. गेल्या काही काळात वैयक्तिक लोकांची कामे करण्याचा मला अनुभव आहे तसेच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी कसलीही तमा न बाळगता आवाज उठवला आहे. एक आमदाराच्या अतिक्रमणाविरोधात मी आवाज उठवला आणि सरकार दरबारी पाठपुरावा केला, अनधिकृत बांधकाम पाडवला जावा म्हणून प्रसंगी त्या शेड समोर जीवाची पर्वा न करता धरणे आंदोलन पुकारले होते असे त्यांनी बेळगाव live शी दिलेल्या मुलाखातीत म्हटलं आहे.

प्रत्येकाला न्याय मिळणे गरजेचे आहे यासाठी माझे प्रयत्न आहेत. शिवसृष्टीचे आंदोलनही असेच झाले. ४ कोटींचा निधी मिळून पाच वर्षे झाली तरी ही सृष्टी जनतेला खुली होत नव्हती. त्यामुळे आवाज उठवला तेंव्हा ती चावीच एका च्या घरात होती, आपण निवडून आल्यावरच ते काम पूर्ण करणार असा चंग त्याने बांधला होता, मग आवाज उठवून ती सृष्टी खुली केली. त्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत .अडचणी ताबडतोब सोडवून दिल्या आहेत. गरिबांना पेन्शन, शेतकऱ्यांचा सांडपाण्याचा प्रश्न सोडवला आहे. अनगोळ चा विकास केला आहे. आमचा प्रश्न आणि विकास या दोन्ही गोष्टींवर आपण भर दिला आहे असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की रोजगार मिळवून देण्यासाठी भांडणे आमचे कर्तव्य आहे. या प्रश्नासाठी रायगडावर उपोषण करण्यासही मी तयार आहे. रस्त्यावरची लढाई सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आज जे आपले युवक पाईक म्हणून जे काम करत आहेत ते काम उत्तम आहे, नेते मंडळी जर एकत्र आले तर सर्वांना एकत्र आणणे अवघड नाही. शलीकडे एकीचे मेळावे घेतले जात आहेत, आता पाईकांनी एक कमिटी करून नेते मंडळींना एकत्र करून त्यांचा अनुभव घ्यायला पाहिजे, त्यातून चांगले काम होऊ शकेल.

उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करेन, माझ्या कामाची दखल घेऊन उमेदवारी मिळाली तर त्यातून आणखी कामे करून आणायची आवाज उठवायची माझी तयारी आहेअशी देखील भूमिका त्यांनी मांडली.

गेल्या आठवड्यात अनगोळ गावातील सर्व समाज बांधवांची एक बैठक घेतली होती त्यात देखील  गावाने माझ्या पाठीशी रहाण्याच आश्वासन दिले आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.विकासा बरोबर सीमा प्रश्न मुद्दा घेऊन मी कार्य करण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.