Tuesday, April 16, 2024

/

पत्नीला पुस्तकं भेट देऊन साजरा केला महिला दिन

 belgaum

अनेक ठिकाणी महिलांचे सत्कार करून महिला दिन साजरा केला गेलाय मात्र शहरात असाही एक कार्यकर्ता आहे ज्याने महिला दिनी पत्नीला दिली पुस्तक भेट देऊन हा दिवस साजरा केलाय.

नवभारत बुक स्टॉल, बेळगाव येथें डायमंड पब्लिकेशन्स यांनी भरवलेल्या पुस्तक विक्री व प्रदर्शनावेळी, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी आपल्या पत्नीला रुपये पाच हजारांची मराठी पुस्तके भेट देऊन, एक आगळा वेगळा जागतिक महिला दिन साजरा केला.

Ganesh daddikar

 belgaum

या छोटय़ाखानी कार्यक्रमा प्रसंगी डायमंड पब्लिकेशन्सचे प्रतिनिधी कृष्णा पाटील व नवभारत बुक स्टॉलचे मालक बाळासाहेब मोरे उपस्थित होते.मराठी भाषा ज्ञान वाढलं पाहिजे म्हणून वेगळ्या पद्धतीचा अवलंब त्याने केला आहे.

हे प्रदर्शन व विक्री येत्या रविवारी पर्यंत बेळगाव येथे चालू राहणार आहे. महिला दिन झाला तरी उद्या परवाही आपल्या पत्नीला पुस्तके घेऊन देण्याची संधी आहे. या संधीचे सोने करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.