Tuesday, November 19, 2024

/

परवानगी नसताना जाहिराती प्रसारीत करु नयेत- जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

 belgaum

निवडणूक आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने स्थानिक केबल टीव्ही आणि इतर उपग्रह चॅनेलवर जाहिराती प्रसारीत करावयाच्या असतील तर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण समितीची परवानगी सक्तीची आहे. अनुमती नसताना जाहिराती प्रसारीत केल्यास स्थानिक टीव्ही केबल ऑपरेटर विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी एस. जियाउल्ला यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या केबल नेटवर्कच्या एमएसओ आणि ऑपरेटरांच्या बैठकीत ते बोलत होते.निवडणूक आचार संहिता लागू झाल्यावर निवडणूक प्रचारासंदर्भात स्क्रोलसह कोणतीही जाहिरात प्रसारीत करावयाची झाल्यास त्या त्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडे एमसीएमसीने दिलेल्या प्रमाणपत्राची केबल ऑपरेटरांनी चौकशी करुन ते प्रमाणपत्र मागून घ्यावे असे ते म्हणाले.
आता एमसीएमसी यापुढे प्रत्येक जाहिरातीची कसून माहिती जाणून घेतल्यानंतरच हे प्रमाणपत्र देणार असल्याने प्रमाणपत्र नसताना कोणतीही जाहिरात प्रसारीत केल्यास केबल टीव्ही ऑपरेटर विरुध्द कारवाई करावी लागणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.पक्ष उमेदवारांना सूचनाविधानसभा निवडणुकीबाबत टीव्ही चॅनेल, स्थानिक टीव्ही केबल नेटवर्क किंवा वृत्तपत्राव्दारे जाहिरात द्यावयाची झाल्यास राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण समितीचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.निवडणूक प्रचाराचा खर्च उमेदवाराच्या खात्यात सहभागी होणार असल्याने प्रत्येक जाहिरात प्रसारीत करावयाची झाल्यास त्या जाहिरीतीची संपूर्ण माहिती, स्क्रिप्ट, प्रसाराचा कालावधी आणि जाहिरातीच्या बिलाची किंमत नमूद केल्यावरच एमसीएमसीकडून प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी केबल ऑपरेटरना दिली.जिल्ह्यातील सर्व एमएसओ आणि केबल ऑपरेटरनी निवडणूकी बाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे. एखाद्या वेळेस नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास दंड आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला.
उमेदवारांच्या जमा खर्चावर निवडणूक आयोग कटाक्षाने सूक्ष्म नजर ठेवणार असल्याने जाहिरात प्रसाराबाबतच्या सर्व नियम आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे, अशी विनंती आचार संहिताचे नोडल अधिकारी रमेश कळसद आणि निवडणूक जमा खर्च समितीच्या नोडल अधिकारी एम.सी. अनिता यांनी स्थानिक केबल ऑपरेटरना केली.माहिती खात्याचे वरिष्ठ सहाय्यक निर्देशक गुरुनाथ कडबूर, बीआरडीएसचे प्रतिनिधी राजू पाटील, हॅथवे एमएसओसह अनेक केबल ऑपरेटर बैठकीला उपस्थित होते.dc meeting   मुद्रक व प्रकाशकांनी माहिती द्यावी : जिल्हाधिकारी
दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर निवडणूक प्रचाराबाबत पोस्टर्स, विनंती पत्रके, भित्ती पत्रकांसह कोणत्याही प्रकारची प्रचार साहित्यांची छपाई करावयाची झाल्यास त्याच्यावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव आणि पत्ता तसेच छपाई केलेल्या प्रतींची संख्या सक्तीने नोंद करणे आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी एस. जियाउल्ला यांनी सांगितले.
कोणत्याही व्यक्तीने निवडणूक प्रचाराच्या छपाईचे काम दिल्यास त्या व्यक्तीकडून प्रकाशकाचे नाव सक्तीने सहीनिशी घ्यावे. शिवाय प्रकशकाने आपले नाव, पत्ता नमूद करुन सही केलेले पत्र दोन परिचित व्यक्तीच्या सहीने देणे आवश्यक आहे. प्रकाशकाकडून योग्य ते पत्र घेतल्यानंतरच निवडणूक प्रचाराच्या साहित्याची छपाई करावी अशी सूचना जिल्हाधिकारी जियाउल्ला यांनी मुद्राकांना केली.
निवडणूक प्रचाराच्या साहित्याची छपाई केल्यानंतर प्रकाशकांनी छपाई केलेल्या प्रती जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना सादर करणे आवश्यक आहे. यदाकदाचित निवडणूक आयोगाच्या नियम व सूचनांचे उल्लंघन झाल्यास सहा महिन्याची शिक्षा किंवा दोन हजार रु. दंड अथवा शिक्षा आणि दंड अशा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.