कर्नाटक गीत गायचे असेल तर सीमाभागातील मराठी बांधवांच्या भावनांशी का खेळता?हे वाक्य विधान परिषदेतले राष्ट्रवादी चे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांचे..
विधी मंडळाच्या अधिवेशनात बेळगाव प्रश्नी मुंढे पुन्हा आक्रमक झाले होते त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना खडे बोल सुनावले.
मुंढे म्हणाले की कर्नाटक सीमेचा प्रश्न आजही प्रलंबित आहे यावर बोलावं की नाही दादांचं भिऊ वाटू लागलंय पण मला बोलावं लागेल. सीमेवरील मराठी बांधव अखंड महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन करत आहे. मात्र राज्यातील एक मंत्री कर्नाटकात जाऊन कर्नाटक गीत गातात आणि राज्यपालांच्या अभिभाषणात त्या मराठी बांधवांचे प्रश्न का मांडत नाहीत असा संतप्त सवालही त्यांनी केला.