Friday, May 3, 2024

/

अनुभवी नगरसेवक म्हणून छाप पाडलेले किरण सायनाक

 belgaum

महा पालिकेत आमदार संभाजी पाटील यांच्या सोबत गेली पाच वर्ष मराठी महापौर करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेले आणि पालिकेतील मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणून विकास कामे करण्यात मोलाची भूमिका बजावत असलेले सतत चार टर्म नगरसेवक पदाचा अनुभव असलेले माजी महापौर किरण सायनाक यांचीही दक्षिणेत समितीच्या तिकिटावर दावेदारी आहेच.

उमेदवारी मिळाली तर विजयी पताका फडकवेनच आणि मिळाली नाही तरी जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी काम करून विजयी पताका फडकवण्यासाठी मदत करणारच, असे सांगतात माजी महापौर किरण सायनाक.

मागील वेळी समितीत दुफळी पडली आणि काही थोडक्या मतांनी आपला प्रभाव झाला. २०१३ च्या निवडणुकीत आमचे नेते किरण ठाकूर यांनी समोरील उमेदवाराच्या दृष्टीने तोला मोलाचा उमेदवार निवडून काही काळ संयम राखण्याचा सल्ला दिला होता यामुळे विजय मिळवून आणणे या एकाच ध्येयाने काम केले आहे.त्यानंतर पालिकेत मध्येही आपण मराठी बाजू टिकवून धरण्यासाठी केलेल्या कामाची कल्पना संपूर्ण जनतेला आहेच. यावेळी जर पुन्हा विधानसभेसाठी संधी मिळाली तर मागील वेळी पराभूत झाल्याचा जो ठपका आहे तो धुऊन काढण्यासाठी संधी मिळू शकेल अशी भूमिका देखील त्यांनी बेळगाव live कडे मांडली आहे.

 belgaum

saynak kiran

जनप्रतिनिधी म्हणून दोन्ही राष्ट्रीय उमेदवारांचा पराभव करण्यासाठी आपण योग्य उमेदवार ठरेन असे आपल्याला वाटते. मात्र उमेदवारी पाहिजेच असा हट्ट नाही. उमेदवारी मिळाली तर नक्कीच समिती आणि मराठी माणसाचा आवाज भक्कम होईल.सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात आलेला आहे. एकीच्या बळामुळे शेवटच्या टप्प्यात मराठी माणसाचा आवाज दाखवून द्यावा लागणार आहे.१९८० पासून आपण कार्यरत आहोत. नगरसेवक पदाची चौथी टर्म यावेळी सुरू आहे. महापौर होण्याची संधी चौथ्या वेळी मिळाली. महापौर असताना जास्तीत जास्त विकासावर आपण भर दिला आहे. मराठी माणूस विकास करत नाही हा ठपका आपण दूर केला आहे. विकासाचा मुद्दा मुळातच सुरू करून प्राधान्य दिलं असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की सीमाप्रश्नाचा मुद्दा येईल तेंव्हा कुठलाही त्याग करायची तयारी सुरुवातीपासून आहे, आजही आहे आणि भविष्यकाळातही राहणार आहे.
जास्तीत जास्त रस्ते रुंदीकरण, स्मार्ट सिटीत बेळगाव शहराचे नाव घालणे, २४ *७ पाणी योजना हे सारे मीच करून घेतले आहे. अमृत योजना झाली, एसटीपी प्लॅन मंजूर झाला, निधी मंजूर करन घेतले. प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डात कामे करून आणण्यावर भर दिला. माझ्या काळात सरकारी निधी व इतर निधी वगळता प्रत्येक वॉर्डासाठी प्रत्येकी २५ लाखाचा स्वतंत्र वॉर्ड बजेट मिळवून दिला. हे करणारा मी एकमेव महापौर ठरलो असून असे इतर कुणाच्याही काळात झाले नाही की मनपाचा स्वतंत्र निधी मिळवून दिला आहे.

सर्व ५८ नगरसेवकांशी आपले जवळचे संबंध आहेत. निवडणुकीला जर बसलो तर मीच का? असा प्रश्न विचारला तर दक्षिण मतदार संघात निवडून येण्यासाठी उमेदवाराला किमान ५५ ते ५६ हजार मतांची गरज आहे. मराठी मते ४० हजाराच्या घरात आहेत. उरलेला फरक भरून काढण्याची क्षमता माजी आहे. मुस्लिम, मारवाडी, लिगायत आणि इतर धर्माशी आपले संबंध असल्याने आपण विजयी होण्यासाठीची मते घेऊ शकतो असा दावा देखील त्यांनी केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.