ज्या मतदार संघात उमेदवारच जन माणसात मत चांगले आहे त्यना तिकीट मिळून जाईल सर्व्हे सुरु आहे निरीक्षकांचा अहवाल पाहूनच तिकीट वाटपाचे काम चालू होईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर यांनी दिली आहे.
शुक्रवारी राज्य कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याकडून आर टी ओ सर्कल जवळील बांधण्यात येणाऱ्या कॉंग्रेस कार्यालयाची पाहणी राज्य कॉंग्रेस प्रभारी वेणुगोपाल, उर्जा मंत्री डी के शिव कुमार ,लक्ष्मी हेब्बाळकर ,फिरोज सेठ यांनी पाहणी केली यावेळी ते पत्रकारांशी ते बोलत होते.
बेळगाव हा ऐतिहासिक जिल्हा असून उपराज्यधानी गांधीजी आगमन झालेले शहर आहे या ठिकाणी कॉंग्रेस कार्यालय उत्तम असल पाहिजे आगामी निवडणुकीच्या अगोदरच कॉंग्रेस कार्यालय उद्घाटन केल जाईल म्हणून इमारतीच्या कामाची पाहणी केली आहे अशी माहिती मंत्री डी के शिवकुमार यांनी व्यक्त केल.राहुल गांधीनी राष्ट्र ध्वज आमचा धर्म अस म्हटलं आहे म्हणून बेळगावात देशातील उंच राष्ट्र ध्वज स्थापित केला आहे असेही ते म्हणाले. कॉंग्रेस मधील नेत्यात दुही नाही तस काही असल्यास राहुल गांधीच्या दौऱ्या नंतर दुही मिटवू अस देखील त्यांनी पुढे स्पष्ट केल.
.