belgaum

Exam tenshan studentफ्रेंडस्,मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचय की,वर्षभर आपण फुलॉन जोश मध्ये असतो आणि मग अचानक परिक्षा तोंडावर येतात.एन परिक्षेच्या काळात नेमकं काय करायचं? कोणत्या नोटस् काढायच्या?कोणत्या विषयाचा अभ्यास कधी करायचा? या प्रश्नांनी टेन्शन यायला लागतं.परिक्षेची भीती तर लहानपणापासुन आपल्या पाचवीलाच पुजलीय नाही का? मग चांगले मार्कस् मिळवण्यासाठी धावाधाव,घोकंपट्टी,रात्रीची जागरणं,जागे रहाण्यासाठी चहा-कॉफीचा अतिरेक,खाण्यापिण्याकडे पुर्ण दुर्लक्ष,नो फ्रेंडस्,नो फोन कॉलस्,इकडुन नोट्स् मिळव तिकडुन नोट्स् मिळव.घरोघरी अक्षरश: सुतकी वातावरणच निर्माण करतात.अगदी पालकही यात पुर्ण सहभागी होतात.मुले तर कानात परिक्षेचे वारे भरल्यासारखे भरकटत जातात.याचा परिणाम काय होतो परिक्षेत नेमके उत्तरच आठवतच नाही,नाहीतर एन परिक्षेच्या वेळीच आजारपण येते किंवा जबरदस्त फ्रस्टेशन.आता या क्षणी अभ्यास कसा करायचा या विषयावर मी तुम्हाला लेक्चर वगैरे देणार नाही आहे.हो पण तुमच्याशी गप्पा मारुन तुमचे टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे.
यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे नियोजन करा.व्यवस्थित प्लनिंग करा आणि त्यानुसार वागण्याचा थोडा प्रयत्न करा बस्स.आपण जो अभ्यास करत आहोत तो आपल्या भल्यासाठी,आपल्या उत्कर्षासाठी करत आहोत हे नेहमी लक्षात ठेवा.त्यामुळे अभ्यासाचा कंटाळा येणार नाही आणि अभ्यास करताना मन देखाल प्रसन्न रहाते.मुळात अभ्यास करताना घोकंपट्टी करण्याची काहीच आवश्यक्ता नसते कारण मार्कस् ओरियंटेड अभ्यासापेक्षा नॉलेज ओरियंटेड अभ्यासच जीवनात प्रत्येक टप्प्यावर फायदेशीर ठरतो. म्हणुन अभ्यास करताना थ्री आर फॉरम्युला वापरायला विसरु नका.1.READ AGAIN AND AGAIN 2.REMEMBER 3.REPRODUCE केलेला अभ्यास लक्षात राहीपर्यंत पुन्हा पुन्हा वाचा,वाचलेले लक्षात ठेवा आणि लगेच त्याच्या नोट्स् काढा म्हणजे परिक्षेच्या वेळी महत्वाचे मुद्दे तुम्हाला नक्की आठवतील.परिक्षेसाठी करत असलेला अभ्यास म्हणजे शिकण्याची नवी संधीच आहे असा दृष्टीकोन ठेवा त्यामुळे तुम्ही हळुहळु तो एन्जॉय करु लागाल.सतत अभ्यास एके अभ्यास केल्यामुळे मेंदुवर,शरीरावर एकप्रकारचा ताण येतो त्यामुळे थोडासा विरंगुळा करण्यास काहीच हरकत नाही आहे.फक्त तो स्ट्रेस आऊट करण्यापुरताच मर्यादित असायला हवा याची काळजी घ्या.जेवणाच्या वेळा पाळा मुख्य म्हणजे पौष्टिक आहार घ्या,कमीत कमी 6 ते 7 तास पुरेशी झोप घ्या.जमल्यास व्यायाम,प्राणायाम देखील करा.सर्वात महत्वाची गोष्ट परिक्षा,स्पर्धा या आयुष्यभऱ असणारच पण जर आपले ध्येय मार्क्सस् बरोबर ज्ञान प्राप्त करणे हे असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.ऑल दि बेस्ट…….
आर्टिकल सौजन्य-डॉ सोनाली सरनोबत

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.