नारायण गौडा आणि एस जिया उल्ला यांचा कंग्राळी बी के येथील मेळाव्यात निषेध ठराव मांडण्यात आला.
तालुका एकीकरण समितीच्या मेळाव्यास सुरुवात , छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊ नये असं वक्तव्य करणाऱ्या करवे अध्यक्ष नारायण गौडा आणि सहकारी पथ संस्थात देखील कन्नड सक्तीचा आदेश बजावणारे जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांचा निषेध ठराव मांडण्यात आला. उपस्थित शेकडो युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या घोषणा देत ठराव संमत केला.
कोल्हापूर जिल्हा पंचायत सदस्य धैर्यशील माने,के डी सी सी सदस्य रणजित सिंग पाटील यांनी शिव प्रतिमा पूजन दीप प्रजवलन करून युवा मेळाव्याचे उदघाटन केलं.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर,जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, ए पी एम सी सदस्य तानाजी पाटील, युवा आघाडीचे शाम पाटील मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते.