Thursday, April 25, 2024

/

बेळगाव दक्षिणमध्ये समितीच्या इच्छूकांची वाढली संख्या

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समिती ने अध्याप विधानसभेसाठी उमेदवार निवड किंवा चाचपणी अध्याप सुरू केलेली नाही, पण सर्वत्र इच्छूकांची संख्या वाढू लागली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. याठिकाणी समितीचा विजय निश्चित असल्याचा अंदाज सगळीकडेच व्यक्त होत असून यामुळे अनेकजण स्वतःच्या उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत.
नुकत्याच एका कन्नड चॅनेलने केलेल्या सर्व्हे मध्ये उत्तर, खानापूर आणि ग्रामीण या तीन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील आणि दक्षिण मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार येईल असा अंदाज मांडला आहे. काही वृत्तपत्रांनीही समितीच्या बाबतीत दक्षिण दिग्विजय शक्य असल्याचे अंदाज व्यक्त केले आहेत. यामुळेच दक्षिणेत इच्छूक वाढले आहेत.
माजी महापौर सरिता पाटील यांचे नाव चर्चित आहे. ज्येष्ठ समिती नेत्या दिवंगत लता पाटील तसेच येळ्ळूर या सीमाप्रश्नातील लढवय्या गावच्या सुनबाई असलेल्या सरिता यांनी वारंवार आपला आवाज उमटवून योगदान दिले आहे. महिला मतदार, मराठा आणि मराठी मतदार आकर्षित करून घेण्याची तयारी सिद्ध केली आहे, यामुळे आपला आवाज कर्नाटक विधानसभेत पोचावा यासाठी विधानसभा निवडणुकीत संधी मिळावी म्हणून त्या प्रयत्नशील आहेत.
याच बरोबरीने मनोहर होसुरकर, माजी महापौर किरण सायनाक, समितीनेते प्रकाश मरगाळे आणि मागील विधानसभेत संभाजी पाटील यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका निभावलेले संजय सातेरी,आणि नगरसेवक म्हणून प्रभावी कार्य केलेले विनायक गुंजटकर या मंडळींनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.या शिवाय मराठी गट नेते पंढरी परब आणि किरण गावडे शाहपूर भागातून माजी नगरसेवक नेताजी जाधव  यांची देखील नाव चर्चेत आहेत. आमदार संभाजी पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात दक्षिण मतदार संघात मोठ्या प्रमाणात शासकीय फंड आणून विकास काम राबवली आहेत त्यांचाही दावा दक्षिणेत असणार आहे.

मनोहर होसुरकर यांनी वडगाव भागात मेळावे आयोजित करून तयारी सुरू केली आहे. सायनाक हे यावेळी निवडून येण्याची संधी असल्याने पुन्हा प्रयत्नात आहेत, सीमाप्रश्नाच्या दाव्यात महत्वाची भूमिका बजावणारे आणि स्थानिक आंदोलनात सदैव आघाडी घेणारे प्रकाश मरगाळे हे ही यावेळी रिंगणात उतरण्याच्या मार्गावर आहेत.
संजय सातेरी यांचा पिरनवाडी ए पी एम सी जागा जिंकण्यात मोठा रोल आहे ते युवा कार्यकर्ते असल्याने मागील पाच वर्षात समितीच्या लढयात काम केले आहे यामुळे त्यांनीही आपला दावा केला आहे भेटी गाठी सुरु केल्या आहेत.
स्थानिक पंचाचा पाठिंबा घेऊन अनगोळ भागातून नगरसेवक विनायक गुंजटकर हे सुद्धा कामाला लागले असल्याने इच्छुकांची यादी वाढत चालली आहे.
इच्छुक जास्त असले तरी राष्ट्रीय पक्षासारखी गआणि समितीच्या ग्रामीण मतदार संघा सारखी स्थिती इथे नाही. कोणालाही एकाला द्या, आम्ही सर्वजण काम करून निवडून आणू अशी भावना त्यांच्यात आहे ही जमेची बाजू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.