ट्रक ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना जुन्या पी बी रोड वर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
घटना स्थळा वरून समजलेल्या माहिती नुसार सुजाता परशराम कारगी वय 45 रा.देवांग नगर वडगाव अस मयत महिलेचं नाव आहे तर बसवराज सिद्धप्पा कारगी वय 55 हे जखमी झाले आहेत.
बसवराज हे आपल्या ऍक्टिव्हा दुचाकी वरून बेळगाव कडे जात असतेवेळी जुने पी बी रोड हिंद इंजिनियरिंग जवळ हा अपघात घडला आहे.रहदारी दक्षिण पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.