belgaum

सुधीरकुमार रेड्डी यांनी स्वीकारला पदभार..

0
217
Sudhir reddy
 belgaum

Sudhir reddyबेळगाव जिल्ह्याचे नवे एसपी म्हणून सुधीरकुमार रेड्डी यांनी मावळते जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.बी.आर. रविकांतेगौडा यांच्याकडून आपल्या अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली.

मूळ आंध्रप्रदेशच्या गुंटूर गावचे असलेले सुधीरकुमार रेड्डी हे २०१० सालच्या बॅचचे आयपीएस पोलीस अधिकारी आहेत. मंगळूर जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावत असलेल्या सुधीरकुमार रेड्डी यांची राज्य सरकारने बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून बदली केल्याचा आदेश नुकताच बजावला असता ते आज सेवेत रुजू झाले आहेत.

कर्नाटकात सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याची जबाबदारी राज्य सरकारने माझ्यावर सोपविली आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याच्या चाकोरीतून मी कााम करणार असल्याचे सुधीरकुमार रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 belgaum

अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रविंद्र गडादी, आयपीएस प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अधिकारी कृष्ण मिश्रा तसेच गोकाक, बैलहोंगल व चिकोडी विभागातील पोलीस अधिकाारी अधिकारग्रहण समारंभ प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.