आगामी विधान सभा निवडणूक ध्यानात ठेवत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली . जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी जिल्हाधिकारी कार्यलयातून जनजागृती फेरीस सुरुवात केली. मतदान करा आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करून घ्या असं आवाहन करत हि रॅली काढण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातून फेरीस सुरुवात केल्यावर कॉलेज रोड किर्लोस्कर रोड समादेवी गल्ली खडे बाजार शनिवार खुट, कचेरी रोड द्वारा पुन्हा डी सी ऑफिस जवळ रॅली समाप्त करण्यात आली
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्यकाने मतदान करणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वानी आपली नाव मतदार याद्यांत आहेत की नाही हे पाहायला हवं . निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीहूची तयारी चालविली आहे असं जिया उल्ला यांनी म्हटलं आहे . यावेळी जिल्हा पंचायत सी ई ओ रामचंद्रन राव ,पालिका आयुक्त शशिधर कुरेर, अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर आर एस नाईक आदी उपस्थित होते .