खडक गल्ली दगडफेकी प्रकरणी पोलिसाकडून अटक झालेल्या युवकांची सुटका करा अशी मागणी करत घोषणाबाजी करणाऱ्या त्या युवकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मार्केट पोलिसांनी सुमोटो(स्वत होऊन केस) सात जणावर गुन्हा दाखल केला आहे.
बेळगाव बार असोसिएशनजिल्हा सत्र न्यायाधीशां कडे गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती त्या नुसार सत्र न्यायाधीश सतीश सिंह यांनी पोलिसांना याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
मार्केट पोलिसांनी घोषणाबाजी केलेल्या सय्यद जलाल रा . बशिबान कंपाऊंड ,आयेशा एम सनदी/ मुल्ला रा बाळेकुंद्री,नावीद मादार रा. कोतवाल गल्ली,बारगिरी रा बशिबान कंपाऊंड, अल्ताफ खानापुरी रा . बशिबान कंपाऊंड, साकिब रा . बशिबान कंपाऊंड, युनुस हुक्केरी रा. दरबार गल्ली यांच्या सह २० ते २५ जणावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव live ने देखील काल( शुक्रवारी) कोर्ट आवारात घोषणाबाजी करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी बातमी दिली होती त्यामुळे पुन्हा एकदा live ने अचूक बातमीचा वेध घेतला आहे.