आपल्या नावात विद्यापीठ असा शब्दोल्लेख करणाऱ्या संस्थांनी हा शब्द काढून टाकावा, युनिव्हर्सिटी ऐवजी इन्स्टिट्यूट असा शब्द ठेवावा अशी सूचना युजीसी( विद्यापीठ अनुदान आयोग) ने केली आहे.
यासाठी आज दुपारी ४ पर्यंत वेळ देण्यात आलाय. ३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही सूचना करण्यात आली आहे.
या यादीत के एल ई संस्थेचाही समावेश आहे.एकूण १२३ संस्थांना अशी सूचना दिली आहे. अभिमत दर्जा दिलेल्या संस्था पदवी देऊ शकतात मात्र त्या विद्यापीठ असे स्वतःला म्हणून घेऊ शकत नाहीत. असे युजीसी चे म्हणणे आहे.