Sunday, May 5, 2024

/

अरुण सिनेमा आता लवकरच नव्या रुपात

 belgaum

ARUn multiplexबेळगावच्या चित्रपटगृहांचे चित्र बदलत चालले आहे. प्रकाश सिनेमा नंतर आता लवकरच अरुण चित्रपटगृहाचा चेहरा बदलणार आहे. कोण आहेत यामागे? नक्कीच महेश कुगजी.
कुगजी यांनी अरुण थिएटर चालवण्यास घेतले आहे आणि या गृहात ते आमूलाग्र बदल करणार आहेत, तीन स्क्रीन असणारे हे थिएटर बेळगावच्या टिळकवाडी भागात नक्कीच मोठी जादू करेल असा विश्वास त्यांना आहे.
अरुण मध्ये आता तीन स्क्रीन लागणार आहेत. यासाठी तीन ओडिटोरिम होणार असून यापैकी एक सर्वात मोठे ६०० आसनक्षमतेचे असणार आहे.

महेश कुगजी यांना फिल्म लाईन चा अभ्यास आहे. ते स्वतः साईशोभा कम्पनीच्या माध्यमाने चित्रपट वितरण करतात. यामुळे लवकरच नवं नवे चित्रपट अरुण मध्ये पाहायला मिळणार आहेत.

कर्नाटकात बंगळुरू नंतर बेळगावातील अरुण थिएटर मल्टीप्लेक्स मध्येच अद्यावत मोठी स्क्रीन असणार आहे ते 30 बाय 60 अशी असणार असून जानेवारी महिन्यात सुरुवात होईल असा दावा महेश कुगजी यांनी केला आहे.

 belgaum

बंगळुरू नंतर अरुण मल्टीप्लेक्स मध्ये साकारणार सर्वात मोठी अध्यावत स्क्रीन-कसं होणार अरुण मल्टीप्लेक्स नवणीकरण काय म्हणताहेत महेश कुगजी पहा बेळगाव live चा व्हीडिओ

https://m.facebook.com/story.php?story_fbid=496659377358327&id=375504746140458

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.