उद्योग खात्री योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार केलेल्या मुचंडी ग्राम पंचायत अध्यक्ष सह पी डी ओ आणि संगणक ऑपरेटर वर कारवाई करा या मागणीसाठी मुचंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली.
मुचंडी ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात पी डी ओ विवेक गुरव संगणक ऑपरेटर नागेश यांना तात्काळ निलंबित करा तसेच ग्राम पंचायत अध्यक्षांना पदावरून हटवून त्यांच्यावर क्रिमिनल केस दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला याना दिलेल्या निवेदनात केली आहे . गेल्या काही दिवसात मुचंडी ग्राम पंचायतीच्या रोजगार योजनेत ४० लाखाचा भ्रष्टाचार उघड झाला आहे याची सर्व पुरावे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत . या अगोदर मुचंडी ग्रामस्थांनी अनेकदा तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन दिली होती त्यानुसार तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल तयार केला आहे यात वरील अधिकारी आणि ग्राम पंचायत अध्यक्ष दोषी आढळले आहेत यानुसार कारवाई करावी अशी मागणी देखील मुचंडी ग्रामस्थांनी केली आहे .
मुचंडी येथील रोजगार योजनेत पी डी ओ नी अनेक बोगस नाव समाविष्ट करत बिल वसूल केले आहे इतकंच नाही तर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचं वय वाढवून , अनेक मृतक लोकांच्या नावे ,अनेक सरकारी नोकरी केलेल्यांच्या नावे अपंग वृद्ध लोकांच्या नावे बिल वसूल करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजप नेते मारुती अष्टगी यांनी केला आहे