अल्झायमर य आजाराचे सर्वात महत्वाचे व प्रमुख वैशिष्टय म्हणजे या आजारात होणारी मेंदूच्या पेशींची व रसायनांची हानी ही कायमस्वरूपी अशी असते. ती कुठल्याच प्रकारच्या उपचारपध्दतींनी पूर्णपणे भरून काढणे अवघड असते. परंतु भविष्यात होणार्या मेंदूच्या पेशींची व रसायनांची हानी मात्र विविध उपचारपध्दतींनी पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न करता येतो. या कारणांमुळेच आपल्याला या आजाराची प्राथमिक लक्षणे स्वतःमध्ये वा आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये लवकरात लवकर ओळखता येणे ही काळाची गरज बनली आहे.
अल्झायमर या प्रकारची विस्मृती प्रथम ५१ वर्षे वयाच्या महिलेमध्ये १९०७ मध्ये आढळून आली. ती शोधण्याचे श्रेय अलियास अल्झायमर या जर्मन शास्त्रज्ञाकडे जाते व तेव्हापासून या आजाराला त्यांच्याच नावाने ओळखले जाते. वय वाढत जाते तसे हा आजार होण्याचे प्रमाणही वाढत जाते.
प्रमुख लक्षणे- कालांतराने वाढत जाणारी व कधीही भरून न येणारी मेंदूच्या विविध क्षमता असणार्या भागांची झीज म्हणजेच अल्झायमर.
विसराळूपणा- जुन्या शिकलेल्या व आत्मसात केलेल्या गोष्टींचा हळुहळू विसर पडू लागतो. उदा. स्वतःच्या घराचा पत्ता, नातेवाईकांची नांवे पत्ते, दूरध्वनी क्रमांक, जवळच्या खाणाखुणा इ.
विसराळूपणाच्या सुरूवातीच्या काळात रिसेंट मेमरी मध्ये समस्या येण्यास सुरूवात होते. म्हणजे थोड्यावेळापूर्वी किंवा दिवसांपूर्वी घडलेल्या गोष्टी,
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364