belgaum

शहापूर विभागाने नेहमीच बेळगावकराना आदर्श घालून दिलाय. गणेश मंडळाच्या महा आरतीत सर्व धर्मियांचा सहभाग हा अभूतपूर्व क्षण असून अश्याने सार्वजनिक जीवनात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळं सर्वा समोर हा एक आदर्श निर्माण झाला आहे असे मत पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी व्यक्त केले.Maha aarti

bg

सोमवारी सायंकाळी नाथ पै सर्कल गणेश मंडळात सर्व धर्मीय महा आरतीत सहभागी झाल्या वर ते बोलत होते.शहापूर विभाग शांतता समिती,पोलीस स्थानक आणि शहापूर वडगांव मुस्लिम जमात च्या वतीने महा आरतीच आयोजन केले होते.

अश्या सौहार्द पूर्ण वातावरणा मूळ बेळगावचा उत्सव महाराष्ट्र कर्नाटकात आदर्शवत आणि आगळा वेगळा ठरेल.मुस्लिम ख्रिश्चन आणि इतर समाज घटकांनी या सर्व धर्मीय महा आरतीत सहभाग घेतल्याने शहरात एक शांतता मय वातावरण तयार झाल्याची नांदी निर्मिती झाली ती पोलिसांच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे असं देखील भट्ट म्हणाले.

Maha aarti 2

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मजुकर,माजी नगरसेवक नेताजी जाधव,पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,नगरसेवक दीपक जमखंडी,माजी नगरसेवक रमेश सोंटक्क्की, माजी महापौर महेश नाईक,माजी उपमहापौर संजय शिंदे,चर्मकार समाजाचे बी आर पवार,शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी,मार्केट ए सी पी शंकर मारिहाळ,वडगांव मुस्लिम जमात फयाज सौदागर,शहापूर मुस्लिम जमात बशीर मुल्ला, अब्दुल नुलकर, अब्दुल बागलकोटी, बेपारी कुटुंबीय ,सलीम तोरगल साजिद सय्यद, साजिद सय्यद,सात मुस्लिम जमात पंच यांच्या सह वडगांव शहापूर भागातले नगरसेवक,गणेश महा मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.