Monday, April 29, 2024

/

मध्यवर्ती भागात चोरट्यांचा धुमाकूळ लाखोंचा ऐवज लंपास

 belgaum

शहरातील पाटील मळा या  मध्यवर्ती भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गुरुवारी रात्री दोन घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. माजी पाटील गल्लीतील माजी नगसेविका अनिता किटवाडकर आणि समितीचे युवा कार्यकर्ते विजय होनगेकर यांच्या घरात अज्ञातानी प्रवेश करून  जवळपास अडीच लाखांचा सोन्या चांदीचे दागिने आणि ऐवज लांबविला आहेत.

विजय होनगेकर आणि नारायण किटवाडकर दोघांच्या घरी बाहेरून जिना आहे रेल्वे रूळा पासून जवळ असलेल्या विजय यांच्या घरी तळ मजल्या वर कायम झोपणारी त्यांची  आई  परगावी गेली होती ही संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

सकाळी घटना समजल्यावर श्वान पथकाने पाहणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार विजय होनगेकर यांच्या घरातील साडे पाच तोळे सोने ,१२ तोळे चांदी तर ४ हजार रोख तर माजी नगरसेविकेच्या घरातील १५ हजार रोख रक्कम दीड तोळ्याची सोन्याची चैन एक मोबाईल आणि  तीन ए टी एम अस दोन्ही घरातील जवळपास अडीच लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. खडे बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

 belgaum

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.