Wednesday, May 1, 2024

/

युवा कार्यकर्ता …

 belgaum

बेळगावात अनेक दिग्गज कार्यकर्ते आहेत, नवे उदयोन्मुख कार्यकर्तेही आहेत.नव्यांना प्रकाशात आणण्याचा निर्णय बेळगाव live ने घेतलाय, म्हणूनच या आठवड्याचे व्यक्तिमत्व म्हणून मान देतोय धडाडीचा युवा कार्यकर्ता गणेश दड्डीकर यांना

शास्त्री नगर  आणि महाद्वार रोड भागातील युवा कार्यकर्त्यांच्या फळीतल आघाडीवरच नाव…. अनेक सामाजिक उपक्रमात ते आघाडीवर असतात, याची प्रेरणा आजोबा आणि जुने समितिनिष्ठ कार्यकर्ते ईरप्पा मल्लाप्पा आपटेकर आणि वडील महेश दड्डीकर यांच्याकडून मिळाली असे ते सांगतात. आजोबा त्यावेळी समितीचे महाद्वार रोड विभागातून प्रमुख कार्यकर्ते होते. मराठा मंडळचा नावलौकिक वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. वडील महेश दड्डीकर हे गोपाळ गणेश मंडळ या बेळगावच्या पहिल्या वहिल्या सामाजिक चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, यामुळे सामाजिक कार्याचा वसा त्यांना घरातून मिळाला.

Ganesh daddikarगोरक्षक दलाचे गणेश कार्यकर्ते आहेत. गो मातेचे रक्षण करणे हे काम करताना त्यांनी स्वतःला मराठीसाठी झोकून दिले आहे. नुकत्याच बेळगावात झालेल्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चात त्यांनी आघाडी घेतली होती.युवावर्गाला हाताशी धरून त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.

 belgaum

मराठी तरुणांना रोजगार मिळवून देणे, शाळकरी मुलांना शैक्षणिक मदत, वृक्षारोपणाच्या माध्यमातून मागील ७ ते ८ वर्षांपासून ५०० पेक्षा जास्त रोपांची लागवड, रस्त्यात कुठलाही प्राणी जखमी अवस्थेत दिसला की त्याची शुश्रूषा, युवकांना व्यसनापासून दूर करणे आणि अपघात झाला की धावून जाऊन पटकन रुग्णालयात दाखल करणे यासारखी अनेक कामे ते करतात.

रस्त्यात पडलेल्या खिळ्यांमुळे वाहने पंक्चर होऊ नयेत म्हणून ते खिळेच जमा करण्याचा उपक्रम त्यांनी केलाय. त्यांनी इलेक्ट्रिकल शाखेतून डिप्लोमा केलाय.पेशाने ते संगणक सेल्स आणि सर्व्हिस मध्ये आहेत. एल आय सी चे विमाप्रतिनिधी आहेत. आपले काम सांभाळून समाजाला मदतीचा वसा ते जपत आहेत, त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

संपर्क गणेश दड्डीकर
9844497079

 belgaum

1 COMMENT

  1. khup chhan ani ganesh dada ch abhinandan ani pudhachya vaatachalila shubhechha!!

    dhanyawad belgaonlive ch..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.