Friday, April 26, 2024

/

वृत्तीभंग वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobat
व्दिधा मानसिकता किंवा अस्थिर मन ही कलियुगाची मानवाला मिळालेली अटळ भेट आहे. एकही मनुष्य यातून सुटू शकणार नाही. हे करू, ते करू, ’टू बी ऑर नॉट टू बी?’ यातूनच माणसाच्या आयुष्याचा खेळ सुरू असतो. अवाजवी अपेक्षा, अती महत्वाकांक्षा, मानसिक ताण, कुचंबणा यामुळे अशी दुभंगलेली व्यक्तिमत्व बनत जातात. व्यक्तिमत्व दुभंगल्यामुळे माणसाची वृत्ती, वागणं, बोलणं, विचार करणं हे सगळंच बदलत जाते. या सगळ्या प्रकाराला ’शिझोफ्रेनिया’ किंवा ’वृत्तीभंग’ म्हणतात.

वृत्तिभंग म्हणजे काय?* समाजापासुन माणूस दुरावतो. स्वतःची काळजी घेता येत नाही. आत्मकेंद्रीत बनतो.

स्वतःचा मान अपमान समजत नाही.
विचारांमध्ये सुसूत्रता रहात नाही. विचार भरकटले जातात.

 belgaum

व्यक्ती स्वतःच्या कोषात गुरफटते. मंत्रचळ लागल्यासारखं एकच एक गोष्ट पुनः पुन्हा करू लागते. लैंगिक, धार्मिक विचार अतिप्रमाणात येऊ लागतात. वायफळ बडबड वाढते.
विविध भास, आभास होऊ लागतात. आपल्याविषयी कोणतरी वाईट बोलत आहे, आपल्याकडे बघून हसत आहे, किटक, साप आजूबाजूला वळवळत आहेत से दृष्य श्राव्य भास होतात.

आपण कोणतरी मोठे तालेवार आहोत किंवा आपल्याला दुसर्‍याला मारण्याचा, जीव घेण्याचा हक्क प्राप्त आहे अशी भावना तयार होते. कधी आत्मघात करण्याची वृत्ती बळावते.
अशी लक्षणं किमान सहा महिन्यापेक्षा जास्त आढळल्यास निदान निश्‍चित होते.
दुसर्‍याच्या उपदेशाचा किंवा बोलण्याच काहीही परिणाम दिसत नाही.
* मूड स्वींग खूप प्रमाणात आढळतात, भावनांचा उद्रेक वारंवार होऊ लागतो.
* बाहेरचे आवाज, उजेड, स्पर्श यांना मिळणारा प्रतिसाद अतिप्रमाणात किंवा अति कमी प्रमाणात असा विचित्र असतो.
* तात्विक विचार करता येत नाही. सामान्य ज्ञान नष्ट होते. कॉमन सेन्सच रहात नाही.
स्वतःची ओळखच माणसाला रहात नाही. आपला आत्मा किंवा आपले शरीर हे स्वतःचे नाहीच आपण आपले शरीर सोडून बाहेर आहोत असा आभास होतो.
प्रत्येक रूग्णाला मानसिक धक्का, गंभीर शारीरिक आजार असे विकार किंवा आर्थिक भावनिक फटका बसलेला असणे अशी हिस्टरी असेलच असे नसते. आपोआपच मानसिक संतुलन बिघडू शकते.
कारणे- अति मानसिक शारीरिक ताण, आनुवंशिकता, मानसिक धक्का, मेंदूचे विकार, व्यसनाधीनता, औषधांचा अतिरिक्त वापर यामुळे या विकाराला सुरूवात होऊ शकते.
लक्षण- दुभंगलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपण स्वतःपासून वेगळेच आहोत असा दृढ समज होणे. माणूस परस्परविरूध्द बोलणे, वागणे असा बदलत राहतो. म्हणूनच याला ’स्पलीट पर्सनॅलिटी’ किंवा ’शिझोफ्रेनिक’ म्हणतात. या व्यक्ती तर्कशुध्द विचार (लॉजीकल थिंकिग) करूच शकत नाहीत. यासाठी रूग्णाला ताबडतोब उपचार देणे अत्यावश्यक असते. नंतर रूग्णाला स्वतःविषयी, जगाविषयी भ्रम होऊ लागतो. भ्रमिष्टावस्था झाल्यावर स्थळ काळाचे भान, आत्मभान रहात नाही. भग्नावस्थेत रूग्ण माणसासारखा वागतच नाही. अशावेळी इस्पितळात भरती करणेच योग्य असते. ही स्थिती रूग्णाच्या व इतरांच्या दृष्टीनेही अत्यंत वाईट व गंभीर असते.
उपचार-
विकाराच्या प्राथमिक अवस्थेत होमिओपॅथिक व पुष्पौषधीचा उत्कृष्ट उपयोग होतो. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार घेणे चांगले असते.
भ्रमिष्टावस्थेत गेल्यानंतर मॉडर्न मेडिसीनचा उपयोग जास्त करावा लागतो. त्याशिवाय होमिओपॅथीक औषधे देऊन विकार बरा करता येतो. रूग्ण समुपदेशनाच्या मनस्थितीत नसल्याने स्ट्रॉंग औषधांचाच वापर करावा लागतो.
होमिओपॅथी- पाहूया काही औषधांची माहिती.
सिमीसीफ्युगा- प्रसूतिपश्‍चात येणारे नैराश्य व वृत्तीभंग यावर उपयुक्त. काहीतरी वाईटच होणार आहे, असा दृढ विश्‍वास, गाडीत बसण्याची, बंदिस्त जागेची भीती, बाष्कळ बडबड, आत्मघात करण्याची वृत्ती शरीरातील सगळ्या नसा तटतटत असल्याची भावना, डोक्यावर काळा ढग रेंगाळत असल्याचा भास, अस्वस्थता, अस्थिरता.
बेलाडोना- चंचलता, अधीरता, भूत प्रेतांचे भास, उन्मती, उन्मत, अस्वस्था, कोणताही संवाद नको असतो. परंतु जोरजोरात ओरडणे, सकाळ- संध्याकाळ मानसिक आवेग येणे, समोरच्या व्यक्तींवर हल्ला करणे, मारणे इ. प्रकार होतात. आवाज, स्पर्श, अजिबात सहन होत नाही.
इग्नेशिया- परस्परविरोधी तक्रारी, अति रडणे, अति हसणे, उदास तर कधी एकदम उत्फुल्ल! मानसिक धक्क्यातून तयार झालेल्या तक्रारी शारीरिक तक्रारी सतत बदलत राहतात. सतत हुंदके देत राहणे मुसमुसत राहणे. त्याशिवाय स्ट्रामेनियम, ह्योसायमस ही पराकोटीची वेडाची लक्षणे असल्यावर वापरण्याची औषधे आहेत. फक्त ही औषधं होमिओपॅथीक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय देऊ नयेत, कारण त्यामुळे मिश्र लक्षणांची सुरूवात होते.
डॉ सोनाली सरनोबत

केदार क्लिनिक ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक ०८३१-२४३१३६४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.