Saturday, December 21, 2024

/

बेळगावातल वायु दलाच एअरमन प्रशिक्षण केंद्र

 belgaum

दुसऱ्या जागतिक युध्दावेळी म्हणजेच १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला बेळगाव नजीक सांबरा येथे विमानतळ आणि एअर मन प्रशिक्षण केंद्र अर्थात एटीएस ची स्थापना झाली.भारतातील युद्ध दलाचे अग्नेयेतील मुख्यालय अशी या केंद्राची ओळख. ती आजही कायम आहे,बघूया काय आहे इतिहास…..

बेळगाव विमानतळाला लागून असलेले हे केंद्र त्यावेळी एक शक्तिशाली युद्धतळ होते. तत्कालीन आर ए एफ चे एक केंद्रच होते. १९४२-४३ च्या सुमारास आर ए एफ ने एक तीन फुटी खांब येथे रोवला होता, तो आजही एक स्मृतिचिन्ह म्हणून कायम आहे. आर ए एफ च्या जुन्या क्षणांची एक आठवण म्हणून हा स्मृतिस्तंभ उभा आहे.

ats-sambra

रॉयल एअर फोर्स ची ६७२ क्रमांकाची squadron त्यावेळी कार्यरत होती. तिच्या वाहतुकीसाठीच विमानतळ उभारले गेले होते. २६ फेब्रुवारी ते ३० फेब्रुवारी १९४५ हा काळ दुसऱ्या जागतिक युद्धतील महत्वाचा काळ, यावेळी ही squadron आग्नेय आशिया कमांड ने सांबऱ्यात आणली होती.

स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये कर्नाटकाच्या विशेष राखीव पोलीस दलाकडे हा तळ हस्तांतरित झाला. १९६१ मध्ये गोवा मुक्ती आंदोलनात या तळाचा वापर झाला होता.१९६३ मध्ये जालहळ्ळी येथील जी टी एस केंद्रही येथेच हलविण्यात आले. १९८० मध्ये या केंद्राचे नामकरण ए टी आय अर्थात administrative training institute असे करण्यात आले.

air men 2

२००१ मध्ये  ATI चे नामकरण  Airmen Training School (ATS) असे झाले.  Joint Basic Phase Training (JBPT) देण्याचे महत्वाचे केंद्र अशी ओळख या केंद्राला देण्यात आली.

१९६१ च्या गोवा मुक्ती आंदोलनात भारतीय वायुदलाची कामगिरी मोठी आहे. भुदलाला आवश्यक हवाई रसद पुरविण्याची जबाबदारी या केंद्राकडे होती . त्यावेळच्या Indian  Western Air Command, Air Vice Marshal  असलेले अधिकारी एरिक पिंटो यांची नेमणूक या मुक्ती आंदोलनाच्या कमांडर पदी करण्यात आली होती.या केंद्रावर बरीचशी एअर components एकत्रित करण्यात आली होती . Squadron क्रमांक ४५ चा मुख्य तळ कार्यरत होता. ८ युद्धविमाने सक्रिय होती. हवाई संरक्षणाची जबाबदारी   Squadron क्रमांक १७ कडे होती. हंटर्स च्या तुकडी कडून हे काम सुरू होते. Harvards, Otters and Mi-4 helicopters चा वापर माहिती, दळण वळण आणि हल्ल्यांसाठी केला गेला होता.

sambra airmen training centre

‘Operation Vijay’, वेळी  Squadron क्रमांक १७ च्या ७ हंटर्स नि मोठी कामगिरी केली.  CO आणि Squadron Leader जयवंत सिंग यांनी या तुकडीचे नेतृत्व केले होते. गोवा येथील बांबोली च्या वायरलेस स्टेशन वर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानेच मुजोर पोर्तुगीजांचे कम्बरडे मोडले आणि १९ डिसेंबर रोजी त्यांना शरणागती पत्करावी लागली होती.

या केंद्रात सुप्टेंबर २००४ पर्यंत All Through Training pattern (ATT) चालविला जात होता. प्रशिक्षणार्थींना २४ आठवड्याचे प्रशिक्षण दिले जात होते. ऑक्टोबर २००४ पासून  Encapsulated Pattern of Training (EPT) ची सुरुवात झाली.  याला Just In Time Training (JITT) असेही म्हटले जाते २००६ पासून ते कायम करून चार सत्रात प्रशिक्षण दिले जाते.

बेळगावातील या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर देशातील एकमेव नॉन टेक्निकल ट्रेनिंग सेंटर आहे.कुणीही नॉन टेक्निकल ट्रेड मध्ये वायू सेनेत भरती झाल्यास सांबरा येथील प्रशिक्षण केंद्रातच बेसिक ट्रेनिंग घ्यायला पाहिजे त्यामुळे या ट्रेनिंग सेंटरला महत्व आहे.

प्रदूषण मुक्त वातावरण आणि सुसज्ज व्यवस्था ही येथील वैशिष्ट्ये आहेत. येथे तयार होणारे जवान देशाच्या कोणत्याही भागात टिकाव धरू शकतात. शिक्षणाची सोय, ताजा भाजीपाला आणि सम्पूर्ण पृथ्वीवर मिळत नाही असे स्वर्गीय वातावरण ही येथील आजही खासियत आहे.

– Wg Cdr R D Mohan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.