Monday, April 29, 2024

/

त्वरित बस पास वितरित करा

 belgaum

Ksrtcजून महिना अर्धा झाला तरी कॉलेज विध्यार्थ्यांना अजून पर्यंत पास उपलब्ध करून न दिल्याने विध्यार्थ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळं त्वरित बस पास वितरित करा अशी मागणी एकीकरण समिती कार्यकर्ते भागोजी पाटील सुनील जाधव आणि शिष्टमंडळाने केली आहे.

के एस आर टी सी चे विभागीय नियंत्रण अधिकारी श्रीनिवास यांची भेट घेऊन मागणी केली आहे यावेळी श्रीनिवास यांनी के एस आर टी सी कंट्रोलर यांना बोलावून वरिष्ठांना बंगलोर पत्र लिहून समस्या सोडविण्याचे आदेश दिले. दरवर्षी जून महिन्यात शाळा कॉलेज सुरू होतात बस पास जून ते एप्रिल पर्यंत दिला जातो मात्र अद्याप पास न दिल्याने गरीब विध्यार्थ्यांना याचा त्रास होत असल्याची तक्रार देखील या शिष्टमंडळाने केली आहे. रामकृष्ण सांबरेकर, कामराज काटकर आदि यावेळी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.