समता बंधुता आणि मानवतेचे प्रणेते, शिक्षण महर्षी, कृषी महर्षी, आरक्षणाचे जनक, रयतेचा राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बेळगावातील मुख्य चौकात उभा करावा आणि त्या चौकाला शाहू महाराजांचं नाव ध्या अशी मागणी क्षत्रिय मराठा परिषदेने केली आहे.
मंगळवारी महापौर संज्योत बांदेकर आणि उपमहापौर नागेश मंडोळकर यांची भेट घेऊन मराठा परिषदेने ही मागणी केली आहे.बहुजन समाजासाठी कार्य करणाऱ्या शाहू महाराजांच समता बंधुता आणि मानवते साठी केलेले कार्य अतुलनीय आहे त्यामुळे आजच्या पिढीला शाहू महाराजांचा आदर्श घालून देण्यासाठी बेळगाव शहरात शाहू महाराजांचा पुतळा उभा करावा . शहरातील मध्यवर्ती चौकात हा पुतळा उभा करून चौकास शाहू महाराजांचं नाव ध्या अशी मागणी क्षत्रिय मराठा परिषदेने केली आहे .
यावेळी क्षत्रिय मराठा परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष अनिल बेनके, ए एम पाटील ,वकील सुधीर चव्हाण, किसनराव येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.