रविवारी शेतात पिकाला पाणी पाजावायला गेल्या असता बिजगरणी येथील लक्ष्मी भास्कळ या ४२ वर्षीय तरुण महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाला होता लक्ष्मी सारखे अनेक शेतात काम करणारे सर्प दंशाने गेल्या काही वर्षात मृत्यू मुखी पडले आहेत. या निमित्ताने शेतकऱ्यांनी शेतात काम करतेवेळी सर्प दंशा रोखण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत कोणती दक्षता घ्यावी याबाबत सर्प मित्र आनंद चिट्टी यांच काय मत आहे चिट्टी यांनी गेल्या पंधरा वर्षात हजारो सर्पांना जीवदान दिलंय आणि शेकडो सर्प जनजागृती व्याख्यान केली आहेत . बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावच्या आनंद चिट्टी यांनी बेळगाव live ला खास मुलाकात दिली आहे .
सर्व प्रथम माणूस साप बघितल्यावर घाबरतोय शेतकरी म्हणून जन्माला आल्यावर शेतात असुदेत किंवा कुठेही असुदेत अडगळीत अडचणीत हात घालतेवेळी कायम काळजी घेतली पाहिजे .या देशात साप दिसल्यावर अध्याप कुणालाही चावला नाही त्याला न कळत स्पर्श झाल्यावरच तो दंश करतो बिजगरणी येथील महिलेने सापाला पहिला बघितली असती तर हात लावली नसती किंवा तुडवली नसती त्यामुळे सापाला न बघता अश्या जास्त घटना घडतात याची काळजी सर्व प्रथम घेतली पाहिजेत. शेतकरी शेतात काम करत असतेवेळी सर्वात जास्त साप राहायचं ठिकाण कुठल असेल तर ते कडबी साप जास्त वास्तव्य करत असतो या ठिकाणी उंदीर जास्त असतात म्हणून साप अधिक कडबीत आढळतात या शिवाय शेणी लाकड ठेवलेली जागा आणि अडगळीची जागा भिंती मधील भीगा बिळात अश्या ठिकाणी देखील साप वास्तव्यास असू शकतात . शेतकऱ्याच्या सभोताल हे सगळ वातावरण असत काम करत असतेवेळी आपला हात किंवा पाय सापाला लागतो का स्पर्श होतो का हे सर्वात महत्वाची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी.
भात रोपण लावणी, गवत कापणे अथवा इतर शेताच्या कामावेळी आवाज येईल अशी घुंघरू बांधलेली काठी सोबत घ्या, गवत कापणी वेळी विळ्यालाही घुंघरू बांधावे,गवत कापताना उंच असे मिलिटरी पद्धतीचे बूट आणि हात मोजे वापरावेत. शेतात जेवायला किंवा विसाव्याला बसताना ऐस पीस जागेतच बसावे शेतात नेलेले साहित्य घरी नेताना त्याची चाचपणी करावी. जनावरांना ठेवलेला सुख चारा आणि कडबा राहत्या घरा पासून लाब अंतरावर ठेवा ,लाकूड शेणी काढताना निष्काळजी पाने थेट हात घालू नका भिंती तील छिद्र बीळ मुजवा ,घर नेहमी स्वच्छ ठेवा नेहमी ये जा करण्याची वाट रिकामी असली पाहिजे . विषारी सापाने चावल्यास तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे रुग्णाच्या मनातील भीती दूर करून त्याला कायम आनंदी ठेवावे सर्प दंश झालेल्या ठिकाण पासून हृदया कडील बाजूला आवळ अशी घट्ट पट्टी बांधावी रुग्णाला जास्त हालचाल करू न देता त्याला जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करावेत.
साप दिसल्यास त्वरित संपर्क साधा
आनंद चिट्टी ,निर्झरा चिट्टी
०९६८६५०६४०८,०९९०१४७६४८४