6 एप्रिल च्या आत खटला मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलनमराठा क्रांती मूक मोर्चा संयोजका वर घातलेल्या केस 6 एप्रिल च्या मागे घ्या अन्यथा प्रशासना विरोधात सकल मराठा समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.
जत्ती मठात सकल मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीद्वारे इशारा देण्यात आला आहे. मराठा मूक मोर्चा शांततेत पार पडुन देखील 153 अ अंतर्गत दोन भाषिकात तेढ निर्माण करणे असे गुन्हे नोंद करून नोटीस बजावण्यात आली होती वारंवार तारीख पे तारीख पडत आहे. पुढील सुनावणी 6 एप्रिल रोजी असून पोलिसांनी जर केस मागे न घेतल्यास त्याच दिवशी पोलीस आयुक्त कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत . 8 एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेऊन गावो गावी गल्लो गल्ली बैठका जन जागृती बैठका घेऊन हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे नेते उपस्थित होते
Trending Now