Friday, May 24, 2024

/

मानसिक ताण -डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobat मानसिक ताण मोजण्याचं साधन आज उपलब्ध नसलं, तरी सध्याच्या आधुनिक जगामध्ये, आपल्या आधुनिक दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक मानसिक तणावाचे, ताणाचे प्रसंग आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात. यांच्यामुळे मनावर प्रचंड ताण पडतो असं नाही पण सौम्य प्रमाणातला ताण मात्र आपल्या जीवनामध्ये मनावर बराच काळ असतो तर काही काही वेळा अचानक अतिशय मोठा ताणही येण्याची शक्यता असते.

या दोन प्रकारच्या ताणांना आपण तीव्र ताण आणि सौम्य ताण असं म्हणू या. बहुतेक वेळा तीव्र मानसिक ताण हा तात्कालिक, अगदी थोड्या वेळापुरता असतो. तर सौम्य मानसिक ताण मात्र बराच काळ चालू राहतो. ताण मानसिक असो किंवा शारीरिक, त्याला तोंड देण्याची, त्याला प्रतिसाद देण्याची आपल्या शरीराची पध्दत एकच असते. ताण निर्माण झाला की ज्याला इंग्रजीत फाईट ऑर (Fight or Flight) फ़्लाईट असं म्हणतात ती यंत्रणा कार्यरत होते म्हणजे समोर आलेल्या आव्हानाला तोंड देऊन त्याच्याशी लढाई करणं किंवा ते झेपत नसल्यास पळून जाणं. या दोन गोष्टी साध्य होण्यासाठी अनेक प्रतिक्रिया आपल्या शरीरात ओळीनं घडत जातात.म्हणजे ‘लढा किंवा पळा’ असंच या यंत्रणामार्फत सांगितलं जातं.

हे कसं होतं?
आपला मेंदू आणि हृदय यांना जोडणारी जी चेतासंस्था असते तिला अनुकंपी चेतासंस्था (सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टम्‌) असं म्हणतात ताण निर्माण झाला की अनुकंपी चेतासंस्थेकडून मिळालेल्या संदेशामुळे हृदय अधिक वेगानं आणि अधिक जोरानं स्पंदन पावू लागतं आणि हृदय धमन्या आकुंचन पावू लागतात. दुसरं म्हणजे मेंदूकडून इतर इंद्रियांना गेलेल्या संदेशामुळे ऍड्रेनल ग्रंथीमधून ऍड्रिनॅलिन सारखे स्टिरॉईड्‌स पाझरू लागतात. रक्तातून ही हार्मोन्स आणि स्टिरॉईड्‌स हृदयापर्यंत पोचतात. तीव्र ताणामुळे ऍड्रिनॅनिल आणि त्याच्या जोडीला नॉरऍड्रिनॅलिन या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं तर सौम्य पण दीर्घकाळ असणाऱ्या ताणामुळे कॉर्टिझोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोन्सच्या वाढलेल्या पातळीमुळे पुढील गोष्टी घडून येतात. आपले स्नायू आकुंचन पावू लागतात. त्यामुळे शरीर जरा अधिक टणक बनून, होणा-या दुखापतीपासून शरीराचं रक्षण होऊ शकतं.
• चयापचय क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे अधिक जोर, पळून जायला किंवा लढायला मिळतो. हृदयाच्या स्पंदनाचा आणि त्यामुळे हृदयातून रक्त पंप केल्या जाण्याचा वेगही वाढतो.
• श्वासोच्छ्‌वासाचा वेग वाढतो आणि त्यामुळे शरnergy) पुरवठा होतो.
• अधिक चांगलं दिसावं म्हणून डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होऊ लागतात. तसंच ऐकू येणं, वास येणं यासारख्या क्रिया अधिक तीव्र होतात.
• लघवीची आणि शौचाची भावना होते की ज्याीराला पुरवल्या जाणा-या प्राणवायुचं प्रमाण वाढून पळून जायला वा धोक्याला तोंड द्यायला अधिक ताकद मिळते.
• पचनसंस्थेचं काम मंदावू लागतं त्यामुळे स्नायूंकडे जास्त रक्त आणि ऊर्जेचा, एनर्जीचा (\ुळे पोट रिकामं होऊन पोटाच्या पोकळीत असलेल्या इंद्रियांपैकी कुठे जखम झाल्यास त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
• आपल्या हातापायांतील धमन्या आकुंचन पावू लागतात. म्हणजे जर जखम झाली तर कमी रक्त वाहून जाईल अशी सोय व्हायला लागते. त्यामुळेच विशेष ताणाच्या प्रसंगी आपले हातपाय गार पडतात.
• शरीराला कुठे जखम झाल्यास, दुखापत झाल्यास, कमीत कमी रक्त वाहून जावं म्हणून रक्त गोठण्याची क्रिया अधिक जलद होऊ लागते.
ही सर्व यंत्रणा शतकानुशतकं उत्क्रांत होत आलेली आहे. जेव्हा एखादा धोका स्पष्ट थोड्या काळासाठी असतो, म्हणजेच पडणारा शारीरिक किंवा मानसिक ताण तीव्र असला तरी थोड्या काळासाठी असतो तेव्हा ही यंत्रणा अतिशय उपयोगी ठरते. उदा. समजा सकाळच्या वेळेला तुम्ही फिरायला निघाला आहात. वेळ सकाळची छान, शांत आणि थंड आहे, रस्त्यांवर रहदारी फारशी नाही त्यामुळे तुम्ही रमत गमत मजेत चालला आहात, इकडे तिकडे बघून तुम्ही रस्ता ओलांडताय आणि तेवढ्यात अचानक वळणावरून एक मोटार अतिशय वेगानं वळून तुमच्या दिशेनं येताना तुम्हाला डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसते. मोटार तुमच्या अंगावर आदळणार असा मोठा धोका स्पष्ट दिसताच तुमचं शरीर अतिशय झटपट कार्यरत होतं.

 belgaum

तुमची ‘फाईट ऑर फ्लाईट’ ही यंत्रणा झटपट काम करायला लागते. तुमच्या स्नायूंवर ताण येतो, अंगात एकदम जोम येतो आणि तुम्ही घाईघाईनं पाउलभर मागे उडी मारता. घाईनं तशीच&#x0न उभे राहता पण तरी पायातलं त्राण गेल्यासारखंच तुम्हाला वाटत असतं. पण थोड्याचवेळात म्हणजे काही मिनिटातच तुमची शारीरिक स्थिती पूर्ववत होते. या सगळ्या गोष्टीत जेमेतेम काही मिनिटांचा काळ आणखी दोन पावलं मागे टाकून फुटपाथवर चढण्याच्या गडबडीत फुटपाथच्या कडेला अडकून तुम्ही खाली पडता. त्यामुळे तुम्हाला थोडासा मुका मार बसतो. कोणे बघितलं तर नाही ना असं बघत तुम्ही हळुहळू उठू020;गेलेला असतो. म्हणजे तुमची ‘फाईट ऑर फ्लाईट’ यंत्रणा फक्त काही मिनिटंच कार्यरत झालेली असते आणि नंतर तुमचं शरीर पूर्वस्थितीत परत आलेलं असतं. हे तीव्र मानसिक आणि शारीरिक ताकाळ चालू राहतो.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, विशेषत: शहरातील दैनंदिन आयुष्यामध्ये सकाळी उठल्यापासूनच मानसिक ताणतणावाला सुरूवात होते. एकतर पुष्कळदा सकाळी उठायला आपल्याला उशीर झालेला अ◂ाचं उदाहरण झालं. असा ताण अगदी थोडा काळच असल्यामुळे त्याला प्रतिसाद देणारी यंत्रणा अतिशय थोडा काळ कार्यन्वित होऊन परत शरीर मूळ पदाला आलेलं असत. दुर्दैवानं सौम्य मानसिक ताण मात्र बराच तो. उठल्यावर कधी दिवे गेलेले असतात, तर कधी पाणी आलेलं नसतं. दूधवाला आपल्याला हवं असतं त्यापेक्षा दूध कमी देतो कारण त्याची दुधाची गाडी वेळेवर पोचलेली नसते. वर्तमानपत्र उशिरा येतं. घाईघाईनं सगळं उरकून सकाळच्या न्याहारीसाठी म्हणून तुम्ही टेबलापाशी बसता तेव्हाच नेमका तुमच्या कुणातरी मित्राचा फोन येतो आणि तो सांगतो की तुमच्या दोघांच्या परिचयाचा असलेला एक तिसरा मित्र हृदयविकाराचा झटका येऊन हॉस्पिटलमध्ये भरती झालाय. मित्राशी बोलण्यात तुमचा वेळ तर जातोच शिवाय त्याच्या जोडीला मनावर ताणही पडतो. घाईनं न्याहारी उरकून तुम्ही ऑफिसला जायला निघता आणि नेमकं दारात तुम्हाला तुमचे शेजारी अडवतात. त्यांच्या घरच्या काही समारंभासाठी त्यांना तुम्हाला आमंत्रण द्यायचं असतं. शेजा-यांनी आमंत्रण देणं ही खरं म्हणजे काही ताणाची गोष्ट नाही पण तुम्हाला आधीच उशीर झालदुस-याशीा असल्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात जी काही २-४ मिनिटं जातात त्यांनीसुध्दा मनावरचा ताण आणखी वाढतो.

घाईघाईनं त्यांच्याशी बोलणं उरकून तुम्ही बाहेर पडता आणि बस-स्टॉपवर जाता. तर त्या स्टॉपवर रोजच्या पेक्षा जास्त मोठी रांग असलेली तुम्हाला दिसते! तुम्ही रोज जी बस पकडता त्या बसमध्ये तुम्हाला जागाच मिळत नाही. दुसरी बस यायला अजून १५ मिनिटं वेळ असतो. मग आता १५ मिनिटं वाट बघून ऑफिसला उशिरा जावं की रिक्षा करून खिसा थोडा हलका करावा असा विचार करण्यात तुम्ही ५-१० मिनिटं खर्ची घालता आणि शेवटी स्वत:ची बेचैनी थांबवण्यासाठी म्हणून रिक्षाला हात करता. पण मध्ये विचारात तुम्ही ५-१० मिनिटं घालविली असल्यामुळे, आणि रस्त्यात त्या वेळेला फार रहदारी असल्यामुळे तुम्ही उशीराच्या बसनं ऑफिसला ज्या वेळी पोचला असतात त्याच वेळेला रिक्षानंही पोचता. म्हणजे तुमचा वेळही जातो आणि खिशातले थोडे पैसेही जातात.

असा वाढलेला मानसिक ताण घेऊनच तुम्ही ऑफिसमध्ये उशिरा पोचता आणि नेमकं त्याच दिवशी तुमच्या बॉसनं तुम्हाला आल्याबरोबर त्यांना रिपोर्ट करायला सांगितलेलं असतं. कधी नव्हे ते तुम्ही उशिरा गेल्यावर, जेव्हा बॉसना जाऊन रिपोर्ट करता तेव्हा तुम्ही फक्त आजच उशिरा आलात हे तुम्ही त्यांना सांगूनही खरं न वाटल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं त्यामुळे त्यांनी तुम्हाला काहीही न म्हणता सुध्दा तुमच्या मनावरचा ताण आणखी वाढतो. अशा प्रकारे ऑफिसमध्ये वाढलेला मानसिक ताण घेऊन तुम्ही काम करत असल्यानं कामात चुकाही जास्त होतात. आणि मग चिडचिडलेल्या मन:स्थितीतच तुम्ही संध्याकाळी घरी परतता. घरी गेल्यावर कपडे बदलून, हातपाय धुऊन स्वस्थ आराम करत टीव्हीसमोर पडायचं असं तुम्ही ठरवत असतानाच घरी पोचल्यावर तुम्हाला कळतं की तुमच्या मुलीला बराच ताप आला आहे आणि तिला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं आहे. आता आराम करण्याचा प्रश्न उरलेलाच नसतो. तुम्ही मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाता, त्यांनी सांगितलेलं औषध घेऊन घरी परत येता आणि त्यानंतर झोपेपर्यंत मनात काही मुलीच्या आजाराचे, काही ऑफिसमधल्या कामाचे, काही केलेल्या चुकांचे असे विचार घोळत राहातात. आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हासुध्दा मनावरचा ताण संपूर्णपणे नाहीसा झालेला नसतो. अशा रीतीनं सौम्य पण दीर्घकाळ टिकणाऱ्या मानसिक ताणाला तोंड देत तुम्ही दिवस काढलेला असतो. असं रोजच घडतं असं नाही परंतु दैनंदिन धावपळीच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा मानसिक ताण खूप वेळेला आपल्या अनुभवाला येतो.

या मानसिक ताणाखाली वावरत असताना आपली ‘फाईट ऑर फ्लाईट’ यंत्रणा कार्यान्वित झालेली असते आणि ती दीर्घकाळ कार्यरत राहिल्यामुळे, धोका टाळण्यासाठी म्हणून कार्यरत होणारी ही यंत्रणा नुकसानकारक एवढंच नव्हे तर प्रसंगी प्राणघातकही ठरू शकते. आपल्या हातापायांच्याच नव्हे तर हृदयातल्या धमन्याही आकुंचन पावू लागतात. रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता वाढत जाते. कारण रक्तगोठण्याची क्रिया बराच काळ जलद चालू राहते. शरीराचे बरेच स्नायू या काळात आकुंचित होतात. या स्नायूंमध्ये पाठ, खांदे, मान यांतल्या मोठ्या स्नायूंबरोबरच हृदयधमन्यांमधले अरेखित स्नायूदेखील असतात. एवढंच नव्हे तर खुद्द हृदयातले (Fibres) असतात.

हल्लीच्या आधुनिक युगात कुठल्याच प्रकारचा ताण नसलेलं आयुष्य जगणं ही अशक्य गोष्ट आहे. विशेषत: शहरी धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात तर आता अशक्यच गोष्ट झाली आहे पण शक्यतो कमी ताण येईल असं बघणं आणि आलेला ताण योग्य रीतीनं हाताळणं हे मात्र आपण करू शकतो. ताणाच्या प्रसंगांना योग्य रीतीनं तोंड द्यायचं आणि नंतर मनावराचा ताण जाणीवपूर्वक हलका करायचा हे हृदयविकाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं आता लक्षात येऊ लागलेलं आहे.
ताण नियोजन पुढच्या भागात वाचा
डाॅ.सोनाली सरनोबत
लेखिका होमिओपॅथिक तज्ञ आहेत

सरनोबतस् मल्टीस्पेशालीटी होमिओपॅथी
अमर एंपायर
गोवावेस बेळगाव
09916106896
09964946918

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.