बेळगाव दि १०: बेळगावात होणाऱ्या क्रांती मोर्चास लागणार टी शर्ट आणि टोप्या विकणारे महाराष्ट्रातील युवक बेळगाव पोलिसांच टार्गेट बनले आहेत .”मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे” असे लिहिलेले टी शर्ट विकणाऱ्या एका तरुणाला बेळगावच्या खडे बाजार पोलिसांनी ताब्यात घेतल आहे .
शहाजी भोसले(२५) राहणार कोल्हापूर अस पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाच नाव असून संभाजी चौकात सदर मजकूर असलेली टी शर्ट विकताना ताब्यात घेऊन ३० हून अधिक टी शर्ट आणि इतर साहित्य जप्त केली आहेत . टी शर्ट वर असलेला हा मजकूर वादग्रस्त असल्याचे कारण दाखवून ही पोलिसांनी सदर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे मात्र त्या युवकावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा पर्यंत सुरु होती . मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टी शर्ट विकणाऱ्या युवकास झालेली ही कारवाईने युवा वर्गात संताप उमटवून गेली आहे.