बेळगाव दि १० : भारत सरकारचे परराष्ट्र खाते आणि पोस्टल विभाग यांच्या माध्यमातून सर्व जिल्हा मुख्य पोस्ट कार्यालयांमध्ये पासपोर्ट उपलब्ध केले जाणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पातही याचे सूतोवाच झाले आहे.
बेळगावात पूर्वी पोस्टात पासपोर्ट मिळत होता, नंतर ही प्रक्रिया बंद झाली होती.यामुळे आजतागायत हुबळीची वारी करावी लागत आहे. यातच ही एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष संघटनेचे सतीश तेंडुलकर, विकास कलघटगी, बसवराज जवळी, सेवांतीलाल शाह यांनी केलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे. बेळगावच्या महापौर सरिता पाटील यांनीही या उपक्रमात आघाडी घेऊन पासपोर्ट साठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यास मदत केली होती.