Friday, May 24, 2024

/

क्रांती मोर्चासाठी शहापुरातील चौदा गल्ल्या एकत्रित

 belgaum

बेळगाव दि १० :बेळगावातील ऐतिहासिक असा मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करावा या हेतूने शहापूर येथील चौदा गल्यांची एकत्रित बैठक बोलाविण्यात आली होती . शहापूर जेड गंगापुरी मठात झालेल्या या बैठकीच  महिला मंडळ, युवक मंडळ पंच मंडळी आणि शेकडो कार्यकर्ते एकत्र जमले होते .

शहापूर भागातील लोकांची क्रांती मोर्चात काय भूमिका असेल यावर या बैठकीत सविस्तर पणे चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना माया हॉस्पीटल डॉ उज्वला हलगेकर म्हणाल्या की प्रत्येक महिलांनी जिजाबाई चे गुण घेतले पाहिजेत प्रत्येक घरी शिवाजी जन्माला पाहिजेत तरच मराठा समाजाचा उद्धार होईल . देशातील संस्कृती बिघडत चालली आहे याकडे देखील महिलांनी लक्ष दिल पाहिजेत १६ फेब्रुवारी होणारा क्रांती मोर्चा यशस्वी करूयात.

शहापूर भागातील लोकांनी मोर्चात प्रत्यक्षात सहभागी होण्यापेक्षा जे परगावचे लोक येतात त्यांची सोय करावी असे एकमताने ठरविण्यात आले . यावेळी माजी महापौर महेश नाईक, नगरसेवक विजय भोसले, राजू बिर्जे , सुधा भातकांडे सह पंच मंडळी उपस्थित होती .shahapur maratha meeting

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.