Friday, April 19, 2024

/

आचार संहिता पाळा डिजिटल फलकावर वयक्तिक फोटो नाव नकोत

 belgaum

बेळगाव दि १२ : सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चासाठी शहर भगवमयशिव मय झाल पाहिजेत मात्र अस करत असताना शहरात लावण्यात येणाऱ्या डिजिटल फलकावर वयक्तिक फोटो आणि नाव घालण टाळण्याची गरज आहे.

‘सकल मराठा समाज मूक मोर्चा’ आज देश पातळीवर का नावाजला गेला ? याचे थेट उत्तर आहे ‘शिस्त आणि आचारसंहितेचे ‘काटेकोरपणे पालन. नावातच ‘सकल’ आल्यामुळे इथं कुणाचं नेतृत्व नाही. कि कुणाच्या प्रचाराचे आणि व्यक्ती अथवा पक्षाचा स्तोम माजवण्याचे हे व्यासपीठ न्हवे. बेळगावात हे नियम काटेकोरपणे पाळले जावेत कुठंही काडीचेही गालबोट लागू नये ही समस्त सकल मराठा समाजाची इच्छा आहे  अस असताना देखील काही जन डिजिटल फलकावर आपली नाव आणि फोटो प्रसिद्ध करत आहेत.महाराष्ट्र एकीकरण समिती सह कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या नावाने फलक उभारू नयेत अशी देखील मागणी कार्यकर्त्या कडून करण्यात येत आहे .

 

 belgaum

संभाजी चौकात आणि हुतात्मा चौकांत वयक्तिक नाव आणि फोटो सह फलक लावले आहेत .  बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून सर्व सकल मराठा समाजातील लोकप्रतिनिधी आमदार नगरसेवक सामाजिक संस्था संघटना सर्व जनेतला अवाहन करत आहोत सर्वांनी आचार संहितेच्या नियमाच पालन कराव .jatti math 2 mahila aaghadi photo 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.