Sunday, September 1, 2024

/

क्रांती मोर्चात धडाडणार याच रणरागिण्याच्या तोफा

 belgaum

बेळगाव दि १३ : १६ फेब्रुवारी च्या मोर्चात कोणालाही घोषणा देण्याची अधिकृत परवानगी असणार नाही कोणी ओरडून जोराने बोलणार सुद्धा नाही मात्र बेळगावात अश्या चिमुकल्या  रणरागिणी तयार  झालेत की त्यांची तोफ मात्र धडाडणार आहे आवाज कडाडणार आहे  आणि तेच आहे बेळगाव ऐतिहासिक क्रांती मोर्चाच खास वैशिष्ठ्य !!

गेला आठवडा दिवस जत्ती मठात बेळगावातील निवडक मुलीना क्रांती मोर्चात भाषण देण्यासाठीची तयारी करवून घेतली जात आहे . यात भाषण करण्यासाठी २५ हून अधिक मुलींची तोंडी परीक्षा परीक्षकांनी घेतली यानंतर यातल्या एकूण दहा   जणी ना भाषण करण्यासाठी निवडण्यात आलय . यातील ५ मुली धर्मवीर संभाजी चौकात मुख्य स्टेज वर भाषण करतील तर  २ मुली मोर्चा सुरुवातील शिवाजी उद्यानात भाषण करतील बाकी उरलेल्या ४ मुलीनां अतिरिक्त म्हणून ठेवण्यात येणार आहे .

एकीकरण समितीचे सचिव मालोजी अष्टेकर, कातकर सर ,शिवराज पाटील ,संध्या पाटील आणि संजीत पाटील या पाच निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींची भाषणाचीतयारी झाली आहे. यात मधुरा कुन्डेकर,प्रांजल धामणेकर,अस्मिता देशमुख, तृप्ती सडेकर,सलोनी पाटील , भक्ती तेरसे,प्रांजल जुवेकर,आसावरी पाटील,निकिता घुग्रेटकर, ऋतुजा पाटील सामील आहेत.  एकीकरण समिती सचिव मालोजी अष्टेकर यांनी बेळगाव लाईव्ह ला दिलेल्या माहितीत सांगितले की प्रत्येक मुलीला एकेक विषयात  भाषण करण्यासाठी प्रशिक्षण दिलेलं आहे यात सीमा प्रश्न आणि मराठी भाषा ,शिक्षण ,शेतकऱ्यांचे प्रश्न ,मराठा आरक्षण ,अटरासिटी, महिला संरक्षण , शिवाजी महाराज जीवन चरित्र , शाहू महाराज जीवन चरित्र ,मराठी कागद पत्रांची मागणी  आणि सगळ्या अश्या सामान्य प्रश्नावर तयारी करवून घेतली आहे . त्यामुळे मोर्चा दिवशी या सगळ्यांच्या भाषणाकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत .                                                                                                                                                      selected girls speech morcha

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.