बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मोर्चात अपेक्षेप्रमाणे सीमा प्रश्नांच्या मागणीला प्राधान्य देण्यात आहे हा प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रथम घालण्यात आली आहे या शिवाय शेतकरी आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या देखील मागण्याच समावेश करण्यात आला आहे . वाचा काय आहेत मराठी समाजाच्या मुख्य मागण्या :
☆ महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी सहकार्य करावे.
☆ कोपरी व इतर ठिकाणी घडलेल्या अमानुष घटनेचा निषेध करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी.
☆ अॅट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात योग्य ती सुधारणा व्हावी.
☆ मराठा समाजाचा 2 अ प्रवर्गात समावेश करावा.
☆ पहिली ते दहावीच्या पाठय़पुस्तकात, मराठ्यांचा व छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहासाचा समावेश करावा.
☆ प्रत्येक शासकीय कार्यालयात , छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यात यावी.
☆ घटनेनुसार अल्पसंख्याकांचे सर्व अधिकार मराठा समाजाला मिळावे.
☆ सरकारी परिपत्रके कायद्यानुसार कन्नड बरोबर मराठी भाषेत द्यावीत.
☆ शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती , उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा.
☆ आर्थिक दुर्बल विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख रूपये करावी.
☆ होदेगिरी (जि.दावणगेरी) येथील शहाजी महाराजांची समाधी व कनकगिरी (जि.कोप्पळ) येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांची असलेली समाधी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी.
☆ शेतकऱ्यांच्या दुबारपिकी सुपीक जमीनी रस्ते व इतर कामासाठी संपादित करू नयेत.
☆ मास्टरप्लॅन करताना घरे आणि जागा गेलेल्या लोकांना नुकसान भरपाई मिळावी.
☆ शेतकऱ्यांच्या जमीनीच्या उतार्यावरील “नो क्राॅप” अशी चुकीची नोंद रद्द करावी.