बेळगाव दि ७ : बेळगावची कुलस्वामिनी आणि वैश्यवाणी समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या समादेवी उत्सवाला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला . सोमवारी समादेवी मंगल कार्यालयात वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर यांनी महिला महोत्सवाचे उद्घाटन केल तर लायन्स क्लब ऑफ शहापूर च्या अध्यक्ष मोनिका सावंत यांनी समादेवी महिला दरबार उद्घाटन केल . काकड आरतीने जल्मोत्सव कार्यक्रमाला प्रारंभ झाला . महिलांच्या हस्ते कुंकुमार्चन सोहळा पार पडला .
दिवसभर दर्शन आणि ओटी भरण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती . समादेवी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्री देवी दरबारात अनेक महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टाल लावले आहेत . पालखी ,प्रवचन आदि कार्यक्रमाना भाविकांनी गर्दी केली होती आगामी तीन दिवस गुरुवार पर्यंत समादेवी जन्म महोत्सव सोहळा सुरु असणार आहे. वैश्यवाणी समाजाच्या महिलांनी जवळ पास २२ स्टोल लावले असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने नक्षीकाम साड्या खाद्य पदार्थ आदी स्टोल सामील आहेत . मंगळवारी संगीत भजन होम हवन होणार असून गुरुवारी समादेवी जन्म महोत्सवाचा मुख्य दिवस असून या दिवशी सायंकाळी ६ वाजता पालखी तर दुपारी महा प्रसाद आयोजित केला आहे .