बेळगाव दि ७: बेळगाव शहरातील कडोलकर गल्ली मेणसे गल्ली भातकांडे गल्ली गणपत गल्ली, बापट गल्ली या मध्यवर्ती भागातून हजारोंच्या संख्येने १६ फेब्रुवारीच्या मूकमोर्चात सामील होण्याचा निर्धार कडोलकर गल्लीतील बैठकीत करण्यात आला .
सोमवारी सायंकाळी कडोलकर गल्लीत मध्यवर्ती भागातील मराठी समाजातील युवक महिला पंच मंडळी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत गुरुवार १६ फेब्रुवारी च्या मोर्चात सर्व जनतेने शांततेने आपापल्या घरोघरी कुलूप लाऊन मोर्चात समील व्हाव आणि सीमा प्रश्नाच्या सोडवणुकी साठी मराठी भाषिकांची ताकत दाखवावी अस आवाहन बैठकीत सर्वानुमते आवाहन करण्यात आल. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, मराठा मोर्चा प्रवक्ते गुणवंत पाटील,एस जी देसाई,संजय मोरे, मराठी युवा मंच चे सुनील जाधव,चिमणराव जाधव ,राजू मर्वे आदी उपस्थित होते .