बेळगाव दि १४ : १६ रोजी होणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्याच्या संयोजकांनी पोलीस आयुक्त जी कृष्ण भट्ट आणि उपायुक्त जी राधिका यांच्या समोर सुनावणी झाली. वकिलांनी बाजू मांडल्या नंतर पुन्हा उद्या बुधवारी सायंकाळी सुनावणी केली जाणार आहे . प्रकाश मरगाळे, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, नेताजी जाधव, प्रकाशबापू पाटील, सुनील जाधव, राजेंद्र मुतगेकर, गुणवन्त पाटील ,मनोहर किणेकर आणि प्रकाश शिरोळकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी सीमाप्रश्नाचा उल्लेख करून भाषिक तेढ निर्माण होऊन शांतता भंग झाल्यास तुम्ही जबाबदार असल्याचे हमीपत्र देण्याची अट घातली होती. कलम १०८ अनुसार सदर नोटीस बजावण्यात आली होती आता पर्यंत संयोजकांना दोन नोटीसा देण्यात आली असून दोन्ही नोटिशीची सुनावणी बुधवारी होणार आहे . यावेळी वकील म्हणून अड सुधीर चव्हाण, अड महेश बिरजे, अड अमर येळ्ळूरकर आदींनी संयोजकाच्या वतीने बाजू मांडली यावेळी परवानगी दिली नाही तर जमीन घेणार नाही अशी भूमिका संयोजकांनी घेतली या नंतर पोलीस आयुक्तांनी उद्या अधिकृत परवनागी देणार असल्याचे आश्वसन दिल . संयोजक सकल मराठा समाजाच्या वतीने सगळी भूमिका घेत असताना पोलीस प्रशासन सीमा प्रश्न आणि समिती असा उल्लेख करत आहे अशी भूमिका यावेळी संयोजकांनी मांडली
Trending Now