Sunday, December 22, 2024

/

खानापूर रहिवाशी संघटनेची आजची दुचाकी रली रद्द ,सायंकाळी वडगाव मंगाई मंदिराजवळ बैठक

 belgaum

बेळगाव दि ९ : १६ फेब्रुवारीला सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा जन जागृती साठी खानापूर रहिवाशी संघटना आणि मंगाई देवी युवक मंडळाच्या वतीने काढण्यात दुचाकी सायकल फेरी रद्द करण्यात आली आहे .

पोलिसांनी १६ फेब्रुवारी व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या मोर्चा अथवा रलीस परवानगी दिली नाही त्यामुळे  संभाजी उद्यानातून गुरुवारी निघणारी सायकल फेरी रद्द केली आहे . दुचाकी फेरी एवजी बैठक घेण्यात येणार आहे. मंगाई देवी युवक मंडळ आणि खानापूर रहिवाशी संघटनेच्या वतीने  मंगाई मंदिराजवळ बैठक घेण्यात येणार आहे  . या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन देविदास चव्हाण पाटील आणि मिलिंद देसाई यांनी केल आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.